सुहास पाटील
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रेल्वे मंत्रालय, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्स ( CEN No. ०१/२०२४) ‘असिस्टंट लोको पायलट (ALP)’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ५,६९६. RRB मुंबईमधील रिक्त पदे – एकूण ५४७ (सेंट्रल रेल्वे – ४११, वेस्टर्न रेल्वे – ११०, दक्षिण सेंट्रल रेल्वे – २६). पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट (ALP). वेतन श्रेणी – लेव्हल-२, मूळ वेतन रु. १९,९००/-, अंदाजे वेतन रु. ३६,०००/- दरमहा.
पात्रता – (दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी) १० वी उत्तीर्ण आणि फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, मिलराईट, मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ अॅण्ड टी.व्ही.), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर वेहिकल), वायरमन, ट्रक्टर मेकॅनिक, आर्मोचर अॅण्ड कॉईल वाईंडर, मेकॅनिक (डिझेल), हिट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग मेकॅनिक ट्रेडमधील आयटीआय NCVT / SCVT.
किंवा १० वी उत्तीर्ण आणि वरील ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट कोर्स किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण. (संबंधित डिसिप्लिनमधील इंजिनीअरिंग पदवीधर उमेदवार पात्र आहेत.)
हेही वाचा >>> UPSC ची तयारी : प्रकरण अभ्यास (भाग २)
वयोमर्यादा – (दि. १ जुलै २०२४ रोजी) १८ ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादा – इमाव – ३३ वर्षे; अजा/अज – ३५ वर्षे; (पुनर्विवाह न केलेल्या विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिला – खुला प्रवर्ग/ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे) (ज्या उमेदवारांनी वयाला २५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी अॅप्रेंटिसशिप अॅक्ट अंतर्गत अॅप्रेंटिसशिप कोर्स पूर्ण केलेले उमेदवार – खुला/ ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे) (पूर्वीच्या ग्रुप-डी मधील कर्मचारी जे आता ग्रुप-सी आणि ३ वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. खुला/ ईडब्ल्यूएस – ४० वर्षे, इमाव – ४३ वर्षे, अजा/अज – ४५ वर्षे) (रेल्वे कँटीन, को-ऑपरेटिव्ह सोसायटीज, आणि इन्स्टिट्यूटमधील कार्यरत कर्मचारी – खुला/ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे)).
निवड पद्धती – ( i) कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट ( CBT – r), ( ii) CBT – २, ( iii) कॉम्प्युटर बेस्ड अॅप्टिट्यूड टेस्ट ( CBAT), ( iv) कागदपत्र पडताळणी, ( v) मेडिकल एक्झामिनेशन.
CBT-१ – गणित, मेंटल अॅबिलिटी, जनरल सायन्स, जनरल अवेअरनेस या विषयांवर ( ME) आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट ७५ प्रश्न, प्रत्येकी १ गुण, एकूण ७५ गुणांसाठी वेळ ७५ मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील. RRB नुसार रिक्त पदांच्या १५ पट उमेदवार CBT-१ मधील किमान पात्रतेचे गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना CBT-२ साठी निवडले जातील.
CBT-२ – पार्ट-ए व पार्ट-बी (१०० प्रश्न, ९० मिनिटे) (७५ प्रश्न, ६० मिनिटे) असे दोन भाग असतील. एकूण १७५ प्रश्न, वेळ २ तास ३० मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.
पार्ट-ए – (गणित, जनरल इंटेलिजन्स अॅण्ड रिझनिंग, बेसिक सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग या विषयांवर आधारित प्रश्न)पार्ट-बी – परीक्षेचा अभ्यासक्रम डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग (DGT) मार्फत वेगवेगळ्या टेक्निकल ट्रेडसाठी तयार केलेला असेल जो https:// dgt. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आयटीआय / अॅप्रेंटिसशिप कोर्स पात्रताधारक उमेदवार संबंधित ट्रेडमधील परीक्षा देतील.
(१) डिग्री / डिप्लोमाधारक उमेदवारांना डिसिप्लिननुसार नेमून दिलेल्या ट्रेडसाठी परीक्षा देतील. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, वायरमन, आर्मेचर अॅण्ड कॉईल वाईंडर, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग मेकॅनिक.
(२) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ अॅण्ड टी.व्ही.)
(३) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – फिटर, मेकॅनिक (मोटर वेहिकल), ट्रक्टर मेकॅनिक, मेकॅनिक (डिझेल), टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, हिट इंजिन, मिलराईट, मेंटेनन्स मेकॅनिक.
(४) ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग – मेकॅनिक (मोटर वेहिकल), ट्रक्टर मेकॅनिक, मेकॅनिक (डिझेल), हिट इंजिन, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग मेकॅनिक.
( iii) कॉम्प्युटर बेस्ड अॅप्टिट्यूड टेस्ट ( CBAT) – रिक्त पदांच्या ८ पट उमेदवार कॅटेगरी निहाय CBT-२ पार्ट-ए मधील गुणवत्तेनुसार CBAT साठी निवडले जातील. CBAT विषयी माहितीसाठी उमेदवारांनी RDSO च्या पुढील लिंक पहाव्यात.
( i) rdso. indianrailways. gov. in & gt; verticals & gt; Traffic and Psychology & gt; phychology – candidates corner आणि
( ii) https:// rdso. indianrailways. gov. in/ view_ section. jsp? lang=0,2,456,5821,6119
गुणवत्ता यादी CBAT मधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना CBT-२ Part- अ मधील गुणांना ७० टक्के वेटेज आणि CBAT मधील गुणांना ३० टक्के वेटेज देवून बनविली जाईल.
परीक्षा शुल्क – i) अजा/अज/मा.से./ महिला/ ट्रान्सजेन्टर / अल्पसंख्यांक / आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग ( CBC) ( EBC ही OBC किंवा EWS पेक्षा वेगळी कॅटेगरी आहे) रु.२५०/- CBT-१ साठी बसणा-या अशा उमेदवारांना बँकिंग चार्जेस वगळता रु.२५०/- परत केले जातील. ii) इतर उमेदवारांसाठी रु.५००/- CBT-१ साठी बसणा-या अशा उमेदवारांना बँकिंग चार्जेस वगळता रु.४००/- परत केले जातील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणतीही एक RRB निवडावी. (RRB मुंबई www.rrbmumbai.gov.in) ( RRB बेंगळूरु www.rrbbnc.gov.in) (RRB अहमदाबाद http://www.rrbahmedabad. gov. in) आणि संबंधित RRB च्या वेबसाईटवरील लिंकमधून ऑनलाइन अॅप्लिकेशन दि. १९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावेत. व्हाईट बॅकग्राऊंडवरील रंगीत पासपोर्ट साईज फोटो (JPEG size ३०-७० kb) (उमेदवाराकडे फोटोच्या किमान १२ कॉपीज असाव्यात.) स्वाक्षरीची JPEG इमेज (३०-७० KB) आणि अजा/अज ( Annexure- I मधील) दाखला PDF फॉरमॅटमधील ( upto ५०० KB) स्कॅन करून अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक.
कस्टम्समधील संधी
१) प्रिंसिपल कमिशनर ऑफ कस्टम्स (जनरल) यांचे कार्यालय, मुंबईमध्ये ‘स्टाफ ड्रायव्हर (ऑर्डिनरी ग्रेड) ग्रुप-सी’ पदांची थेट भरती. एकूण रिक्त पदे – २८ (अजा – ४, अज – २, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३). वेतन श्रेणी – लेव्हल-२ (रु. १९,००० – ६३,२००) अंदाजे वेतन दरमहा रु. ३६,०००/-.
पात्रता – ( i) मोटरकार ड्रायव्हर लायसन्स, ( ii) मोटर मेकॅनिझमचे ज्ञान (उमेदवारास मोटरकारमधील लहानसहान दुरुस्ती करता येत असावी.), ( iii) मोटर कार चालविण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव आणि ( iv) १० वी उत्तीर्ण.
इष्ट पात्रता – होमगार्ड/ सिव्हील व्हॉलिंटीयर म्हणून ३ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – (दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी) १८ ते २७ वर्षे (इमाव – १८-३० वर्षे, अजा/ अज – १८-३२ वर्षे).
निवड पद्धती – लेखी परीक्षेनंतर ड्रायव्हिंग टेस्ट/ मोटर मेकॅनिझमचे ज्ञान तपासले जाईल.
लेखी परीक्षा हिंदी/ इंग्रजी आणि स्थानिय भाषेत घेतली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.
अनुभवाच्या दाखल्यामध्ये अनुभवाचा कालावधी (तारखांसह) कोणत्या पदावर काम केला आहे त्याचे नाव आणि कामाचे स्वरूप इ. माहिती असणे आवश्यक.
अर्जाचा नमुना एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. २०-२६ जानेवारी २०२४ च्या अंकात उपलब्ध आहे.
विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेल्या अर्जासोबत पुढील कागदपत्रे स्वयंसाक्षांकीत (फोटो कॉपीज) जोडणे आवश्यक. (१) वयाचा दाखला (१० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र), (२) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र/गुणपत्रक, (३) ड्रायव्हिंग अनुभवाचा दाखला, (४) ड्रायव्हिंग लायसन्स, (५) अजा/ अज/ इमाव/ईडब्ल्यूस दाखले (केंद्र सरकारच्या नेमणूकीसाठी असलेल्या नमुन्यातील).
दोन पासपोर्ट आकाराचे फोटो स्वयंसाक्षांकीत केलेले त्यातील १) अर्जावर चिकटविणे आणि २) १ फोटो अर्जासोबत जोडणे.
विहीत नमुन्यातील अर्ज (इंग्रजी ब्लॉक लेटर ( capital letter) मध्ये भरलेला) सोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकीत केलेल्या प्रतींसोबत पुढील पत्त्यावर साध्या पोस्टाने/ स्पीड पोस्टाने दि. २० फेब्रुवारी २०२४ (१८.०० वाजे)पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. Deputy Commissioner of Customs ( Personnel & Establishment), Office of the Pr. Chief Commissioner of Customs, New Custom House, Ballard Estate, Mumbai – ४०० ००१.