RRB ALP Recruitment 2025: अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. रेल्वेत मेगा भरती सुरू आहे. रेल्वे भरती मंडळातर्फे RRB ALP भरती २०२५ साठी नोंदणी प्रक्रिया १२ एप्रिल २०२५ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ मे २०२५ असेल. असिस्टंट लोको पायलट भरती विंडो इच्छुक आणि पात्र अर्जदारांसाठी rrbapply.gov.in वर ऑनलाइन उपलब्ध आहे.या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील एकूण ९९७० रिक्त जागा भरल्या जातील. उमेदवारांना अर्ज भरण्यापूर्वी RRB ALP भरती २०२५ ची सूचना वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
वेळापत्रकानुसार, सादर केलेल्या अर्जांसाठी अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख १३ मे २०२५ असेल. अर्ज दुरुस्ती विंडो १४ मे ते २३ मे २०२५ पर्यंत उपलब्ध असेल.
RRB ALP Recruitment 2025: पात्रता निकष
RRB ALP Recruitment 2025: शैक्षणिक पात्रता: अर्जदारांनी दहावी उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र धारण केलेले असावे. दहावी उत्तीर्ण आणि तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा केलेले उमेदवार देखील पात्र आहेत. शिवाय, अभियांत्रिकीमध्ये (संबंधित क्षेत्रात) पदव्युत्तर पदवी असलेले अर्जदार अर्ज करण्यास पात्र आहेत.
RRB ALP Recruitment 2025: वयोमर्यादा: रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करणारे उमेदवार १ जुलै २०२५ रोजी १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावेत.
RRB ALP Recruitment 2025: निवड प्रक्रिया
संगणक आधारित चाचणी (CBT-१)
संगणक आधारित चाचणी (CBT-२)
संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT)
कागदपत्र पडताळणी (DV)
वैद्यकीय तपासणी (ME)
RRB ALP Recruitment 2025: परीक्षा पॅटन
प्रारंभिक संगणक-आधारित चाचणी (CBT १) मध्ये एका तासाच्या आत ७५ प्रश्नांची उत्तरे दिली जातील, तर मुख्य परीक्षा (CBT २) दोन भागांमध्ये घेतली जाईल – भाग A मध्ये ९० मिनिटांसाठी १०० प्रश्न असतील आणि भाग B मध्ये ६० मिनिटांसाठी ७५ प्रश्न असतील. जिथे CBT १ आणि CBT २ दोन्हीमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातील.