RRB NTPC Recruitment 2024: भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड पुढील महिन्यात NTPC म्हणजेच नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करू शकते. रेल्वेने नॉन-तांत्रिक पॉप्युलर श्रेणीमध्ये (लेव्हल-४,५,६) १६,१५४ पदे आणि NTPC लेव्हल-२ आणि ३ मध्ये ३४४५ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान रेल्वे मंत्रालयातील या रिक्त पदांवर भरती करण्याची घोषणा केली जाईल, लाखो तरुण रेल्वे ग्रुप डी भरतीची देखील वाट पाहत आहेत. मागील रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सुमारे १.२५ कोटी तरुणांनी अर्ज केले होते. दरम्यान या नॉन- टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीच्या भरतीची आता उमेदवार आतुरतेने वाट पाहत आहेत. रेल्वे २०२४ च्या अखेरीस ६१,५२९ रिक्त पदांवर भरतीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. यानंतर नवीन वर्षात जानेवारी-डिसेंबरमध्ये रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पुन्हा ही प्रक्रिया सुरू केली जाईल. या नवीन नियमामुळे रेल्वेत दरवर्षी रिक्त होणारी पदे वेळेवर भरली जातील आणि तरुणांना वयाची पूर्णता होण्यापूर्वीच नोकऱ्या मिळू शकतील.

jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
North Nagpur, Atul Khobragade, Employee Pension,
या अपक्ष उमेदवाराला निवडणुकीसाठी अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिली एक महिन्याची पेन्शन
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई

रिक्त जागा तपशील (अपेक्षित)

CEN 05/2024 साठी (पदवीधर पदे)

१. चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक – १,७३६ पदे
२. स्टेशन मास्टर – ९९४ पदे
३. गुड्स ट्रेन मॅनेजर – ३,१४४ पदे
४. कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक – १,५०७ पदे
५. वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक-७३२ पदे
६. CEN 06/2024 साठी (अंडरग्रेजुएट पोस्ट)
७. कमर्शियल कम तिकीट क्लर्क – २,०२२ पदे
८. लेखा लिपिक सह टायपिस्ट – ३६१ पदे
९. कनिष्ठ लिपिक सह टायपिस्ट – ९९० पदे
१०. ट्रेन क्लर्क – ७२ पदे

पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:

तपशिलांसाठी, उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध CEN क्रमांक ०५/२०२४, आणि ०६/२०२४ चा संदर्भ घेणे आवश्यक आहे.

निवड निकष

निवड प्रक्रियेमध्ये संगणक-आधारित चाचण्या (CBT-1, आणि CBT-2), टायपिंग कौशल्य चाचण्या, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा यासारख्या विविध टप्प्यांचा समावेश होतो.

हेही वाचा >> गेमिंग फक्त टाईमपास नव्हे! इंजिनिअर्स, आयआयटी पदवीधरांपेक्षा जास्त कमवतायत गेमर्स

अर्ज कसा करायचा?

१. RRB च्या अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in ला भेट द्या

२. ‘RRB NTPC रिक्रूटमेंट 2024 ऑनलाइन अर्ज’ या लिंकवर क्लिक करा.

३. आता तुम्हाला नोंदणीचा फॉर्म येईल.

४. आता, स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज फॉर्मसह पुढे जा.

५. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, अर्ज फी भरा आणि सबमिट करा.

६. अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा.