RRB Railway Paramedical Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण रेल्वे बोर्डाने (RRB विविध श्रेणींमध्ये पॅरा-मेडिकल पदांसाठीच्या भरतीसंदर्भात एक अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून १३७६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १७ ऑगस्टपासून सुरू होणार असून ती १६ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीप्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती प्रक्रियेसंदर्भातील तपशील जसे की, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, नोकरीचे ठिकाण आणि पगार याबाबतची माहिती जाणून घ्यावी.
रिक्त पदांची संख्या – १३७६
‘या’ रिक्त पदांसाठी भरती
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, एकूण १३७६ पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट (७१३), डायटीशियन (०५), ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (०४), क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (०७), डायलिसिस टेक्निशियन (२०), फार्मासिस्ट (२४६) डेंटल हाइजीनिस्ट (०३) हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III(१२६), लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III(२७), पर्फ्युजनिस्ट (०२), फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II(२०), ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट (०२), कॅथ लॅब टेक्निशियन (०२), रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन (६४), स्पीच थेरपिस्ट (०१), कार्डियाक टेक्निशियन (०४), ऑप्टोमेट्रिस्ट(०४), ECG टेक्निशियन (१३), लॅब असिस्टंट ग्रेड II (९४), फील्ड वर्कर (१९) या पदांचा समावेश आहे.
वयोमर्यादा
वेगवेगळ्या पॅरामेडिकल पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा भिन्न आहे, काही पदांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे आणि काही पदांसाठी ती २१ वर्षे आहे. याशिवाय कमाल वयोमर्यादा ३३ ते ४३ वर्षे आहे.
अर्ज फी
अर्ज करण्यासाठी, SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २५० रुपये आहे, तर उमेदवारांच्या इतर श्रेणींसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे.
शैक्षणिक पात्रता
या नोकरीसाठी उमेदवारांनी संबंधित विषयात मेडिकल डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. इतर तपशीलवार माहिती तुम्ही वेबसाईटवरील नोटिफिकेशनमध्ये वाचा.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट लिंक
rrbapply.gov.in/auth/landing
RRB पॅरामेडिकल भरती 2024 साठी कसा करावा अर्ज?
१) सर्वप्रथम RRB च्या अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जा.
२) ”RRB Paramedical Recruitment 2024′ शी संबंधित पर्यायावर टॅप करा.
३) आता तुमच्यासमोर ऑनलाइन अर्जाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
४) आता शैक्षणिक पात्रता आणि इतर विचारलेली माहिती नीट भरा,
५) आता फोटो आणि सहीसह कागदपत्रे अपलोड करा.
६) यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI वापरून अर्ज फी भरा.
७) फॉर्म सबमिट केल्यावर त्याची एक प्रिंट काढा आणि ती तुमच्याकडे ठेवा.