Fake Job News रेल्वे भरती बोर्डातर्फे ४६६० कॉन्स्टेबल आणि एसआय पदांच्या भरतीसाठी २०२४ मधील अधिसूचना जाहीर करण्यात आलेली नाही. रेल्वे बोर्डाच्या नावाने खोटी अधिसुचना जाहिराती सध्या व्हायरल होत आहे पण ही जाहिरात खोटी असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल अधिसुचनेनुसार RRB १५ एप्रिलपासून नोंदणी सुरू करेल मात्र ही नोटीस पूर्णपणे बनावट आहे. पीआयबी फॅक्ट चेकने एक्सवर ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मध्य रेल्वे सुरक्षा विभागाचे अधिकृत एक्सवर(ट्विटर) खाते ( Central Railway RPF ) ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आरपीएफसाठी भरतीच्या मोहिमेची अधिकृत सूचना लवकरच जाहीर केली जाईल. पण अधिसूचना कोणत्या तारखेला प्रकाशित होईल याबाबत कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा बनावट नोटिफिकेशनपासून सावध राहण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे.

हेही वाचा – Mahavitaran Recruitment 2024 : महावितरणामध्ये ६० रिक्त जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख

पीआयबी या वृत्तसंस्थेने केलेल्या फॅक्टचेक दरम्यान ४६६० कॉन्स्टेबल आणि एसआय पदांच्या भरती संदर्भात व्हायरल भरतीची नोटीस खोटी असल्याचे समोर आले आहे. अधिकृत संकेतस्थळावर ट्विटर करत पीआयबीने याबाबत माहिती दिली आहे. रेल्वे मंत्रालयाद्वारे अशी कोणीतीही अधिकृत सुचना जाहीर करण्यात आलेली नाही.

पीआयबीच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, वरील सूचना खोटी आहे. रेल्वे संरक्षण दलात सब-इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलच्या भरतीबाबत रेल्वे मंत्रालयाच्या नावाने जारी केलेली खोटी नोटीस सोशल मीडियावर फिरत आहे. रेल्वे मंत्रालयाद्वारे (@RailMinIndia)द्वारे अशी कोणतीही नोटीस जारी केलेली नाही. तुमची वैयक्तिक/आर्थिक माहिती कधीही शेअर करू नका.”

हेही वाचा – NHM Thane Bharti 2024 : NHM मध्ये १२वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी! एवढा मिळणार पगार; जाणून घ्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख

RRB Recruitment 2024 बाबत नवीन माहितीसाठी रेल्वे रिकृटमेंट बोर्डच्या अधिकृत वेबसाईटला किंवा रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत अकांउटला भेट द्या.