RRB Recruitment 2024 : रेल्वेच्या प्रवासादरम्यान आपल्याला अनेकदा टीटीई किंवा टीसी दिसतात. रेल्वेच्या प्रवासादरम्यान प्रवाशांचं तिकीट बघण्याचं आणि प्रवाशांना जागा मिळण्यासाठी योग्य ती मदत करणं हे टीटीईचं काम असतं. त्यामुळे अनेकांना हे काम आवडतं आणि अनेकांची रेल्वेमध्ये टीटीई किंवा टीसी होण्याची इच्छा असते. मात्र टीटीई नक्की होणार कसे? याबाबत अनेकांना माहितीच नसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला टीटीई होण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे? याबाबत जाणून घेऊ. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भर्ती बोर्ड ८ हजार प्रवासी तिकीट परीक्षक (टीटीई) पदांसाठी रिक्त जागांसाठी भरती करणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in ला भेट देऊन माहिती घेऊ शकतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in