RRB Group D Recruitment Notification 2025 OUT: अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. रेल्वेत मेगा भरती सुरू आहे. रेल्वेत तब्बल ३२ हजारापेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यत आली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचनादेखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालविता, भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी आहे. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.
आरआरबी ग्रुप डी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २३ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे. भरतीद्वारे ३२,४३८ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
कोणत्या पदांसाठी भरती होणार?
या भरती अंतर्गत विविध रेल्वे झोनमधील अभियांत्रिकी, यांत्रिकी, इलेक्ट्रिकल, वाहतूक आणि सिग्नल आणि दूरसंचार (S&T) सारख्या विभागांमध्ये भरती केली जाणार आहे.
पात्रता निकष काय आहे?
- आरआरबी ग्रुप डी रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे:
- मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण किंवा NCVT/SCVT-मान्यताप्राप्त संस्थांकडून ITI प्रमाणपत्र.
- १८ ते ३६ वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र ठरणार आहेत.
- ओबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादेत ३ वर्षांची आणि अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट दिली जाणार आहे.
अर्ज शुल्क किती?
सर्व सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी ५०० रुपये अर्ज शुल्क असेल. CBT मध्ये उपस्थित राहिल्यास लागू बँक शुल्क वजा केल्यानंतर ४०० रुपये परत केले जातील. पीडब्ल्यूबीडी/महिला/ट्रान्सजेंडर/माजी सैनिक उमेदवार आणि एससी/एसटी/अल्पसंख्याक समुदाय/आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईबीसी) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २५० रुपये आहे. अर्ज शुल्क फक्त इंटरनेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा UPI इत्यादींद्वारे भरता येईल.
RRB भर्ती 2025: अर्ज कसा करायचा पाहा
RRB भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली नमूद केलेल्या पायऱ्या फॉलो करा.
- RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर, CEN क्रमांक ०८/२०२४ अंतर्गत RRB भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
- लॉग इन आणि सबमिट करण्यासाठी तुमची क्रेडेन्शियल्स एंटर करा.
- अर्ज भरा, अर्ज फी भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- पुष्टीकरण पृष्ठ सबमिट करा आणि डाउनलोड करा.
- भविष्यातील संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठाची प्रिंटआउट ठेवा.
- अधिक संबंधित माहितीसाठी, उमेदवारांना तपशीलवार अधिसूचना पाहण्याचा सल्ला दिला जातो.