RRC CR Apprentice Recruitment 2023: रेल्वे रिक्रूटमेंट सेलने भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेत अप्रेंटिस उमेदवारांची हजारो पदे भरली जाणार आहेत. या मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत साइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या पदांसाठी २८ सप्टेंबरपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील.

या भरती मोहिमेद्वारे मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस उमेदवाराच्या २४०९ जागा भरल्या जातील. अभियानांतर्गत मुंबई क्लस्टरमध्ये १६४९ पदे, पुणे क्लस्टरची १५२ पदे, सोलापूर क्लस्टरची ७६ पदे, भुसावळ क्लस्टरची ४१८ पदे आणि नागपूर क्लस्टरची ११४ पदे भरण्यात येणार आहेत. या भरती मोहिमेसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा त्याच्या समकक्ष किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्रही असायला हवे.

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!

RRC CR Apprentice Recruitment 2023: वयोमर्यादा
अधिसुचनेनुसार, भरती मोहिमेदरम्यान अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १५ वर्षापासून २४ वर्षापर्यंत असले पाहिजे.

हेही वाचा – युपीएससीद्वारे ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या शेवटची तारीख अन् अर्जाची प्रक्रिया

RRC CR Apprentice Recruitment 2023: अशी होईल निवड
या पदांसाठी उमेदवाराच्या निवडीसाठी गुणवत्ता यादी मॅट्रिकमधील गुणांची टक्केवारी (किमान ५०% एकूण गुणांसह) + ITI ज्या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे त्या आधारे तयार केली जाईल.

अधिकृत अधिसुचना – https://rrccr.com/rrwc/Files/807f6770-0ee4-4e26-9716-ccae837bea92.pdf

RRC CR Apprentice Recruitment 2023: स्टायपेंड
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहिन्याला ७ हजार रुपये स्टायपेंड दिले जाईल.

हेही वाचा –DRDO मध्ये अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

RRC CR Apprentice Recruitment 2023: अर्ज शुल्क
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. मोहिमेसाठी अर्ज शुल्क रु. १०० आहे. उमेदवार डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/एसबीआय चलन इत्यादीद्वारे अर्ज शुल्क भरू शकतात. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत साइटचा संदर्भ घेऊ शकतात.