RTMNU Nagpur Bharti 2024 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी वेगवेगळ्या पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जर तुम्हाला नागपूर विद्यापीठात नोकरी करायची इच्छा असेल तर त्वरीत अर्ज करा आणि संधीचे सोने करा. कोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे, अर्ज कसा करायचा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत तीन पदांसाठी अर्ज मागविले आहे.
- सहायक प्राध्यापक
- शारीरिक शिक्षण संचालक
- ग्रंथपाल
पदसंख्या – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत एकूण ९ जागांसाठी अर्ज मागविले आहे.
- सहायक प्राध्यापक -७
- शारीरिक शिक्षण संचालक – १
- ग्रंथपाल – १
हेही वाचा : MMRCL Recruitment 2024 : मुंबई मेट्रोमध्ये रिक्त पदांची भरती, दोन लाखांपर्यंत मिळेल पगार; आजच अर्ज करा
नोकरी ठिकाण – नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत ही प्रक्रिया राबवली जात आहे.
अर्ज पद्धत – या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत एकूण ९ जागांसाठी तुम्ही ३१ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करू शकता.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य/डीन/संचालक, रुपलता देवाजी कापगते महाविद्यालय, कोकणा/खोबा (न.बा.) ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया – ४४१८०६
अधिकृत वेबसाईट – याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी https://nagpuruniversity.ac.in/ या लिंकवर करावे
अधिसुचना – या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी https://onlinedcudrtmnu.org/approval/approval_report/view_print_adv_format_final_5.php?COLLEGE_ID=EG01753&group_ref_no=RTMNU/GRP/1247/2023-24/ZBVFQ7&group_id=1247 या लिंकवर क्लिक करावे.
शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी पात्र उमेदवारांची शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायची तर अधिसुचना नीट वाचावी.
अर्ज कसा करावा?
वरील पदांकरीता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
अर्ज दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी पाठवावा.