SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियाने हजारो पदांच्या भरती करण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. उमेदवार या मोहिमेसाठी अधिकृत साइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. या मोहिमेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतील.
भरती मोहिमेंतर्गत स्टेंट बँक ऑफ इंडिया ६१६० पदांसाठी भरती मोहिम सुरु करणार आहे. या अभियानासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ आणि संस्थेमधून बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
SBI Apprentice Recruitment 2023: वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षे दरम्यान असावे.
हेही वाचा – १० वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आरोग्य विभागात ६ हजारांहून अधिक पदांसाठी भरती सुरु
SBI Apprentice Recruitment 2023: निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीचा समावेश असेल. लेखी परीक्षेत१०० प्रश्न असतील आणि जास्तीत जास्त १०० गुण असतील. परीक्षेचा कालावधी ६0 मिनिटांचा आहे. सामान्य इंग्रजी चाचणी वगळता, लेखी परीक्षेसाठी १३ प्रादेशिक भाषांमध्ये प्रश्न सेट केले जातील. इंग्रजी आणि हिंदी भाषेव्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू या भाषांमध्येही परीक्षा घेतली जाईल.
अधिसुचना – https://shorturl.at/dlzCP
SBI Apprentice Recruitment 2023: अर्ज शुल्क
या मोहिमेसाठी उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागेल. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांना ३००रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार SBI च्या अधिकृत साइटला भेट देऊ शकतात.
हेही वाचा – भारतीय रेल्वेमध्ये निघाली २ हजारपेक्षा जास्त पदांची भरती; लवकर करा अर्ज
SBI Apprentice Recruitment 2023 : या महत्त्वाच्या तारखा आहेत
अर्ज सुरू होण्याची तारीख: १ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख:२१ सप्टेंबर २०२३
लेखी परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२३