SBI Recruitment 2023: बँकेत नोकरी करून करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १००० हून अधिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. बँकेने १ एप्रिल रोजी जारी केलेल्या जाहिरातीनुसार चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसरच्या एकूण १०२२ पदांची भरती करायची आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि नंतर करिअर विभागात जावे. त्यानंतर, उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून थेट भरती सूचना डाउनलोड करू शकतात आणि अर्ज ऑनलाइन पेजवर जाऊ शकतात.
अशाप्रकारे होईल उमेदवारांची निवड –
मुलाखतीच्या आधारे स्टेट बँकेत भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी, प्रथम प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी केल्यानंतर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. १०० गुणांसाठी मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल. स्टेट बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांसाठी अर्ज करू शकतात. एकूण पदांची संख्या १०२२ आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी, ही भरती SBI द्वारे Anytime चॅनेल अंतर्गत कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.
हेही वाचा – तुम्हीही शोधताय सरकारी नोकरी? इस्रोमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी
ही गोष्ट लक्षात ठेवा –
महत्त्वाचे म्हणजे तरुण उमेदवार या अर्ज प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. या पदांसाठी फक्त SBI किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेतील निवृत्त कर्मचारी अर्ज करू शकतात.
इतका मिळेल पगार –
- चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर – एनीटाइम चॅनल (CMF-AC): दर महिना रु.३६०००/-
- चॅनल व्यवस्थापक पर्यवेक्षक – एनीटाइम चॅनेल (CMS-AC): दर महिना रु. ४१०००/-
- सपोर्ट ऑफिसर – एनीटाइम चॅनेल (SO-AC): दर महिना रु. ४१०००/