SBI Clerk Recruitment 2023 : बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदांच्या तब्बल ८७७३ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहेत. बँक ऑफ इंडिया भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
बँक ऑफ इंडिया भरती २०२३ –
पदाचे नाव – लिपिक (कनिष्ठ सहकारी)
एकूण पदसंख्या – ८७७३
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य वाचा.)
वयोमर्यादा –
- खुला – २८ वर्षे.
- SC / ST – ३३ वर्षे
- ओबीसी – ३१ वर्षे
- अपंग व्यक्ती (सामान्य) – ३८ वर्षे
- अपंग व्यक्ती (SC/ST) – ४३ वर्षे
अर्ज फी –
- सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – ७५० रुपये.
- ST/SC/PWD – फी नाही.
अर्जाची पद्धत – ऑनलाईन.
महत्वाच्या तारखा –
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १७ नोव्हेंबर २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ डिसेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक – https://bank.sbi/web/careers/current-openings
पगार –
भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराला महिना २६ ते २९ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/1TU5XzLefeGureMdfP8JL6HD5tMobID9I/view?pli=1