SBI Recruitment 2024: ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात करिअर बनवायचे आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर लेह आणि कारगिल व्हॅली (चंदीगड सर्कल) सह लडाख UT साठी (ग्राहक समर्थन आणि विक्री) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी https://sbi.co.in/ या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांना बँकेच्या वेबसाइट https://bank.sbi/careers/current-openings वर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करता येऊ शकेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात.
SBI Clerk Recruitment 2024 परीक्षा कशी असेल
अधिकृत सूचनेनुसार, प्राथमिक परीक्षा जानेवारी २०२५ मध्ये तात्पुरती घेतली जाईल आणि मुख्य परीक्षा फेब्रुवारी २०२५ मध्ये तात्पुरती घेतली जाईल.अर्जाची ऑनलाइन नोंदणी आणि फी भरणे उमेदवारांना ७ डिसेंबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ पर्यंत करता येईल.
SBI Clerk Recruitment 2024 वयोमर्यादा:
०१.०४.२०२४ रोजी २० वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त नाही, म्हणजे उमेदवारांचा जन्म ०२.०४.१९९६ पूर्वी झालेला नसावा आणि ०१.०४.२००४ च्या नंतर झालेला नसावा.
SBI Clerk Recruitment 2024 निवड प्रक्रिया:
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) आणि विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी यांचा समावेश असेल.
रिक्त पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार लडाख केंद्रशासित प्रदेशातील विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेत प्रवीण (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) असणे आवश्यक आहे. उर्दू, लडाखी आणि भोटी (बोधी) या भाषांची यादी आहे. निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेच्या ज्ञानाची चाचणी घेतली जाईल. ऑनलाइन मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बँकेत रुजू होण्यापूर्वी ती परिक्षा घेतली जाईल. जे उमेदवार या परीक्षेत पात्र होऊ शकत नाहीत त्यांना नियुक्ती दिली जाणार नाही. ज्या उमेदवारांनी १०वी किंवा १२वी इयत्तेची गुणपत्रिका/प्रमाणपत्र दिले आहे, त्यावर स्थानिक भाषेचा अभ्यास केल्याचे पुरावे असतील तर त्यांना भाषा प्राविण्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही,” अधिकृत नोटीसमध्ये नमूद केले आहे.
हेही वाचा >>सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये १९७ पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
अधिक माहितीसाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्या.