SBI Education Loan : तुम्हालाही परदेशात शिक्षण घ्यायचे असेल; पण पैशांमुळे अडचण येत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने एक विशेष कर्जाची ऑफर दिली आहे. एसबीआयच्या ग्लोबल एड-व्हँटेजविषयी तुम्हाला माहितेय का, ज्याच्या मदतीने विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार करू शकतात. बँकेने नुकतीच परदेशातील उच्च्च शिक्षणासाठी तारणमुक्त कर्जाची मर्यादा वाढवली आहे. पण, या कर्जाचा पर्याय नेमका कसा आहे ते जाणून घेऊ….

एसबीआयचा SBI Global Ed-Vantage पर्याय नेमका कसा आहे?

एसबीआय ग्लोबल एड-व्हँटेज हा एक शैक्षणिक कर्जाचा पर्याय आहे; जो परदेशातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. हे कर्ज विद्यार्थी कोणतेही तारण न देता, ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. त्याच्या मदतीने परदेशात शिक्षण घेण्याची योजना आखणाऱ्या विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी होऊ शकतो.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

SBI ग्लोबल एड-व्हँटेजचे फायदे

एसबीआयचे शैक्षणिक कर्जाचा पर्याय अनेक विशेष फायद्यांसह उपलब्ध आहे. सर्वप्रथम या कर्जाच्या पर्यायासाठी तुम्हाला कोणतेही तारण देण्याची गरज नाही. यात तुम्हाला ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहजगत्या मिळते.

त्याशिवाय कर्ज परतफेडीसाठी १५ वर्षांपर्यंतचा कालावधी उपलब्ध आहे. म्हणजेच विद्यार्थी दर महिन्याला ईएमआयद्वारे सहज पेमेंट करू शकतात. ही कर्जे सहज आणि कमी कालावधीत मंजूर होतात.

प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80(E)अंतर्गतही विद्यार्थी करासंबंधित लाभ घेऊ शकतात. त्यामुळे शैक्षणिक कर्जावरील व्याजावर सूट मिळते. विद्यार्थी हे कर्ज कोणत्याही विषयातील पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, सर्टिफिकेट प्रोग्राम आणि कोणत्याही विषयातील डायरेक्ट प्रोग्रामसाठी वापरू शकतात.

प्रक्रिया शुल्क आणि व्याजदर

प्रत्येक अर्जासाठी १०,००० रुपये प्रक्रिया शुल्क आकारले जाते. कोर्स कालावधी आणि रिपेंमेंट हॉलिडेदरम्यान कर्जावर साधे व्याज आकारले जाते. ७.५ लाख ते ५० लाख रुपयांच्या कर्जासाठी १०.१५ टक्के व्याजदर आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्जावर ११.१५ टक्के दराने व्याज आकारते. त्याच वेळी SBI स्कॉलर लोन योजनेंतर्गत, बँक IIT आणि इतर संस्थांमधील शिक्षणासाठी ८.०५ टक्के ते ९.६५ टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देते.

Story img Loader