SBI PO Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. पदवीधर झालेले आणि नोकरीच्या शोधात असलेले कोणतेही तरुण SBI PO भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी आजपासून म्हणजेच ७ सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जे कोणी यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत, ते SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. SBI प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी अर्जाची प्रक्रिया ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि २७ सप्टेंबर रोजी संपेल.
SBI PO भरती प्रक्रियेद्वारे एकूण २००० पदांची भरती केली जाईल. यासाठी SBI ची प्रिलिम परीक्षा नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतली जाईल. तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर खाली दिलेले सर्व मुद्दे काळजीपूर्वक वाचा.
अर्ज करण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे
या पदांसाठी अर्ज करण्याची योजना आखत असलेल्या सर्व उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय पदवीच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवारही या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत, मात्र यासाठी उमेदवाराला जेव्हा मुलाखतीसाठी बोलावले जाईल तेव्हा त्यांना ३१ डिसेंबरपूर्वी अंतिम पदवी सादर करावी लागेल.
वयोमर्यादा असावी
जे उमेदवार SBI PO भरती २०२३ साठी अर्ज करत आहेत, त्यांची वयोमर्यादा १ एप्रिल २०२३ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे दरम्यान असावी. यासोबतच शासकीय नियमानुसार श्रेणीनिहाय वयोमर्यादेतही सवलत दिली जाणार आहे.
हेही वाचा – DRDO पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी भरती सुरु, महिना ३१ हजार रुपये पगार मिळणार
वयोमर्यादा असावी
जे उमेदवार SBI PO भरती २०२३ साठी अर्ज करत आहेत, त्यांची वयोमर्यादा १ एप्रिल २०२३ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे दरम्यान असावी. यासोबतच शासकीय नियमानुसार श्रेणीनिहाय वयोमर्यादेतही सवलत दिली जाणार आहे.
SBI PO नोकरी कशी मिळवायची
नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांनी प्रथम प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यानंतर मुख्य परीक्षेला बसावे लागते. ही मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना सायकोमेट्रिक चाचणी, ग्रुप एक्सरसाइज आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांना फेज-II आणि फेज-III मध्ये भिन्न पात्रता गुण मिळवावे लागतील.
हेही वाचा SBIमध्ये १०७ जागांसाठी होणार भरती, आजपासून अर्जाची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर
ही आहे अधिसूचना आणि अर्जाची लिंक
SBI PO भरती २०२३ अधिसूचना – https://sbi.co.in/documents/77530/36548767/060923-1_detailed+Advt.+English+PO+23-24_07.09.2023.pdf/
फॉर्मसाठी भरावे लागणार शुल्क
सामान्य/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून रु. ७५० भरावे लागतील आणि SC/ST/PWBD उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की एकदा भरलेले अर्ज शुल्क परत केले जाणार नाही किंवा ते इतर कोणत्याही परीक्षेसाठी वैध असणार नाही.
.