स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आर्मरर्स (केवळ माजी सैनिक/माजी CAPF/AR साठी राखीव) आणि लिपिक संवर्गातील( Clerical Cadre) कंट्रोल रूम ऑपरेटर (केवळ माजी सैनिक/राज्य अग्निशमन सेवा कर्मचारी/माजी CAPF/AR साठी राखीव) या पदांकरिता १०७ जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अर्जाची प्रक्रिया ६ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० ऑक्टोबर आहे.
एसबीआय भरती २०२३ रिक्त जागा तपशील:
ही भरती मोहीम १०७ रिक्त जागा भरण्यासाठी आयोजित केली जात आहे ज्यापैकी ८९ रिक्त पदे लिपिक संवर्गातील कंट्रोल रूम ऑपरेटर पदासाठी आहेत आणि १८ रिक्त जागा आर्मरर्सच्या पदासाठी आहेत.
हेही वाचा – भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी होणार भरती; ‘ही’ आहे शेवटची तारीख, लवकर करा अर्ज
एसबीआय भरती २०२३ वयोमर्यादा :
आर्मरर पदासाठी उमेदवारांचे किमान वय २० वर्षे आणि उमेदवारांचे कमाल वय ४५ वर्षे असावे. कंट्रोल रूम ऑपरेटरच्या पदासाठी, उमेदवारांचे किमान वय २० वर्षे आणि माजी सैनिक/ माजी CAPF/AR साठी कमाल वय ४८ वर्षे आणि राज्य अग्निशमन सेवा कर्मचार्यांसाठी ३५ वर्षे असावे.
अधिसुचना – https://sbi.co.in/documents/77530/36548767/050920231755-Detailed+AD+Final.pdf/0ff0a69a-2d59-a2d3-76b7-34c95bc95e9b?t=1693916808484
एसबीआय भरती २०२३ अर्ज शुल्क :
उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
हेही वाचा- ओएनजीसीमध्ये २५०० पदांसाठी होणार भरती; कोण करू शकते अर्ज, केव्हा आहे शेवटची तारीख?
एसबीआय भरती २०२३ : अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
- एसबीआयच्या अधिकृत साईटला sbi.co.in वर भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर, करिअर टॅबवर क्लिक करा
- एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे उमेदवारांना भरतीसाठी लिंक दिसेल
- लॉगिन तपशील किंवा नोंदणी तपशील टाका.
- अर्ज भरा आणि कागदपत्रे जमा करा.
- अर्ज सादर करा
- पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.