SBI recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत सध्या ‘प्रमुख – कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग’ Head (Corporate Communication & Marketing) या पदासाठी भरती होणार आहे. या पदावर काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने अर्ज कसा आणि कुठे करावा, त्याची अंतिम तारीख काय आहे; तसेच पात्रता निकष जाणून घ्या.
SBI recruitment 2024 : रिक्त पद आणि पदसंख्या
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रमुख – कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग पदासाठी केवळ एक जागा उपलब्ध आहे.
SBI recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
प्रमुख – कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पुढील शिक्षणाची आवश्यकता आहे.
शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून / AICTE/ UGC सरकार मान्य पदवी असणे अवश्यक आहे.
कोणत्याही क्षेत्रात मॅनेजमेंट पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
MBA – मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पदवी/ PGDBM – बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा/ PGDM – मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा – अशा प्रकारचे शिक्षण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
SBI recruitment 2024 : अर्ज शुल्क
जे उमेदवार सामान्य/EWS वर्गातून अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी अर्ज शुल्क – ७५०/- रुपये आहे.
SC/ ST/ OBC/ PwBD वर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
SBI recruitment 2024 – स्टेट बँक ऑफ इंडिया अधिकृत वेबसाईट –
https://sbi.co.in/
SBI recruitment 2024 – अधिसूचना –
https://bank.sbi/documents/77530/0/ADVERTISEMENT_ADV_CRPD_SCO_2023_24_34.pdf/3b001ce8-4856-a118-7ad6-fc5354ab77e3?t=1710859067661
SBI recruitment 2024 : ऑनलाइन अर्जाची लिंक
https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2023-24-34/apply
SBI recruitment 2024 : वयोमर्यादा
प्रमुख – कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही ५५ वर्षे अशी ठेवण्यात आली आहे.
SBI recruitment 2024 :अर्ज प्रक्रिया
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रमुख – कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराने आपली सही आणि फोटो अपलोड केल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अर्ज भरत असताना उमेदवाराने अर्जाबरोबर सर्व आवश्यक असणारी कागदपत्र जोडावी.
तसेच अर्जात दिलेली माहिती ही पूर्ण आणि अचूक असावी.
इच्छुक उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरणे गरजेचे आहे.
अर्जाची अंतिम तारीख ही ९ एप्रिल २०२४ अशी आहे.
प्रमुख – कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग या नोकरीसंदर्भात अधिक माहिती उमेदवारास हवी असल्यास, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीसंबंधित अधिसूचना वाचावी. अधिकृत वेबसाइट, अधिसूचना आणि अर्ज करण्याची लिंक वर नमूद केलेली आहे.