SBI Recruitment 2024: सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी उत्तम संधी चालून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये अधिकारी (खेळाडू) आणि लिपिक (खेळाडू) या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

एसबीआय भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरतीद्वारे एकूण ६८ पदे भरली जातील. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करत आहेत ते १४ ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.

SSC GD Constable 2025
SSC GD Constable 2025 : सरकारी नोकरीची संधी! स्टाफ सिलेक्शन कमीशनद्वारे ३९,४८१ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या कसा करावा अर्ज
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Success Story of Dr Akram Ahmad
Success Story : इच्छा तेथे मार्ग! सहा लाख रुपयांची नोकरी सोडून शेतकऱ्याच्या मुलानं गाठलं परदेश; वाचा मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप लाँच करणाऱ्याची यशोगाथा
elderly woman drives an auto at night to earn a living
‘भीक मागण्यापेक्षा…’ उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवणाऱ्या आईची गोष्ट; VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Fact check police started a new scheme for women Local free ride
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केली का ‘मोफत राईड योजना’? नंबरवर कॉल करण्याआधी जाणून घ्या व्हायरल MSGचे सत्य…
RRB NTPC Recruitment 2024 notification soon know about Eligibility, how to apply and more
RRB NTPC Recruitment 2024: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! पुढील महिन्यात मोठी भरती; जाणून घ्या किती रिक्त जागा भरणार
Cisf Recruitment 2024 Vacancy At Central Industrial Security Force For Constable Fireman
CISF Recruitment: ‘सीआयएसएफ’मध्ये नोकरी करण्याची थेट संधी; १ हजार १३० पदांसाठी भरती, दर महिना मिळणार ६५ हजार पगार
Indian Bank Recruitment 2024 Bank job news Indian bank recruitment for 300 posts
Indian Bank: बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी; इंडियन बँकेत थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी

रिक्त पदांचा तपशील (SBI Sports Quota Recruitment 2024)

अधिकारी (खेळाडू) – १७ पदे
लिपिक (खेळाडू) – ५१ पदे
एकूण रिक्त पदांची संख्या – ६८ पदे

पगार

१) ऑफिसर (खेळाडू) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु ८५९२० पगार मिळेल.
२) लिपिक (खेळाडू) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ६४४८० रुपये वेतन मिळेल.

More Stories On Career : LIC HFL Recruitment 2024 : एलआयसीमध्ये ‘या’ २०० रिक्त पदांसाठी भरती! पदवीधारांनी करा अर्ज; पगार ३३ हजारांपेक्षा जास्त, वाचा तपशील

वयोमर्यादा (SBI SCO Recruitment 2024)

१) ऑफिसर (खेळाडू) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय २१ आणि कमाल वय ३० वर्षे असावे.
२) लिपिक (खेळाडू) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे असावे.

पात्रता

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेची पदवीधर असणे आवश्यक आहे? तसेच, मागील ३ वर्षात संबंधित खेळातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळात देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे.

शैक्षणिक पात्रता (SBI Recruitment 2024)

१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी.
२) मागील ३ वर्षात संबंधित खेळातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळात देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
३) उमेदवारांनी राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
४) किंवा कोणत्याही स्तरावरील स्पर्धेत जिल्ह्याचे किंवा विद्यापीठाचे आंतरविद्यापीठ स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले असावे.
५) किंवा तो संयुक्त विद्यापीठ संघाचा सदस्य राहिलेला असावा.

अर्ज शुल्क

सामान्य/EWS/OBC: ७५० रुपये
SC/ST/OBC/PWBD: मोफत

अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज (SBI Sports Quota Bharti 2024)

१) एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा .
२) होम पेजवर Apply लिंक वर क्लिक करा.
३) रजिस्ट्रेशन करा आणि फी भरा.
४) फॉर्म सबमिट करा. त्याची प्रिंट आऊट घेऊन ठेवा.