SBI Recruitment 2024: सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भारतातील सर्वात मोठ्या बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यासाठी स्टेट बँकेने भरतीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यानुसार उमेदवारांसाठी १४ सप्टेंबर २०२४ पासून sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर अंतर्गत विविध श्रेणींमध्ये डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) आणि असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) अशा पदांच्या जवळपास १५११ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी ४ ऑक्टोबर २०२४ ही अंतिम तारीख आहे. पण नेमक्या कोणत्या पदांसाठी ही भरती होईल तसेच अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि पगार नेमका किती असेल? याबाबत सविस्तर जाणून घ्या… (Bank Latest Govt Jobs)

SBI SCO रिक्त जागा आणि तपशील (SBI Bank Recruitment 2024 Notification)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडरसाठी १५११ रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ज्याद्वारे विविध विभागांमध्ये डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) आणि असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) नियुक्ती केली जाईल.

Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Eid-e-Milad 2024 holiday
Eid-e-Milad holiday: मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द; महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर, जाणून घ्या कारण
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन

कोणत्या पदाच्या किती जागा रिक्त आहेत? त्याचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.

पदनाम रिक्त जागा (Sarkari Naukri SBI Recruitment 2024)

रिक्त पद पदसंख्या
१) डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations४१२
2) डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery१८७
३) डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations८०
४) डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect२७
५) डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security०७
६) असिस्टंट मॅनेजर (System)७९८
एकूण रिक्त पदांची संख्या१५११

शैक्षणिक पात्रता (SBI Bank Recruitment 2024 Qualification)

उमेदवार विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स, इंजिनिअर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्समध्ये B.Tech/BE/MCA/M असणे आवश्यक आहे. तसेच Tech/MS.c पदवी असणे गरजेचे आहे. परंतु प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत अधिसूचना नीट वाचावी,

Read More Todays Trending News : ट्रेनमध्ये माणुसकी म्हणून इतरांना मदत करताय, मग ‘हा’ Video पाहाच; लोक म्हणाले, “भावा…”

वयोमर्यादा ( SBI Bank Recruitment 2024 Age Limit)

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय २१/२५ वर्षे आणि कमाल ३०/३५ वर्षे असावे.

पगार (SBI Bank Recruitment 2024 Salary)

डेप्युटी मॅनेजर पदासाठीच्या उमेदवारांना दरमहा रुपये ६४८२०-९३९६०/- वेतन दिले जाईल. तर असिस्टंट मॅनेजरला मूळ वेतन ४८४८०-८५९२०/- रुपये दिले जाईल. याशिवाय उमेदवारांना इतर प्रकारचे भत्तेही दिले जातील.

अर्ज फी (SBI Bank Recruitment 2024 Application Form Fee)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य/EWS/OBC श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून ७५० रुपये भरावे लागतील. तर SC/ST/PWBD उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

WWW. SBI.CO.IN

एसबीआय बँकेतील भरती प्रक्रियेसंदर्भातील पीटीएफ

sbi.co.in/documents