SBI Recruitment For Sportspersons: सरकारी नोकरीचं स्वप्न उराशी बाळगून अनेक जण दरवर्षी लाखो लोक प्रवेश परीक्षांना बसतात. पण, प्रत्येकाला यात उत्तीर्ण होणे जमत नाही. आता सरकारी बँकांमध्ये नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे खेळाडूंची भरती केली जाते. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकारी (खेळाडू) आणि लिपीक (खेळाडू) या पदांसाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार या अधिकृत संकेतस्थळावरून https://sbi.co.in/ अर्ज करू शकतात.या भरतीसाठी आवश्यक पदे व पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज फी, पगार याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या…
SBI Recruitment For Sportspersons: पदे व पदसंख्या :
स्टेट बँक ऑफ इंडियाने शेअर केलेल्या अधिसूचनेनुसार या भरती मोहिमेद्वारे एकूण ६८ जागा भरल्या जातील.
अधिकारी – १७ जागा
लिपीक – ५१ जागा
SBI Recruitment For Sportspersons: पगार :
अधिकारी या पदासाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना ८५,९२० रुपये महिन्याला पगार असेल; तर लिपीक या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ६४,४८० रुपये महिन्याला पगार दिला जाईल.
SBI Recruitment For Sportspersons: वयोमर्यादा :
अधिकारी या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार २१ ते ३० वर्षे वयोगटातील असावेत आणि लिपीक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षे यादरम्यान असावे.
SBI Recruitment For Sportspersons: शैक्षणिक पात्रता :
वर नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मागील तीन वर्षांत क्रीडा क्षेत्रातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
SBI Recruitment For Sportspersons: अर्ज शुल्क :
अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवारांनी अर्ज शुल्क ऑनलाइन स्वरूपात भरणे आवश्यक आहे. जनरल, ईडब्ल्यूएस व ओबीसी उमेदवारांसाठी ७५० रुपये अर्ज शुल्क आहे; तर एससी, एसटी व पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
या पदांसाठी फक्त खाली नमूद केलेल्या विषयातील खेळाडूंनाच परवानगी दिली जाईल :
बास्केटबॉल
क्रिकेट
फुटबॉल
हॉकी
व्हॉलीबॉल
कबड्डी
टेबल टेनिस
बॅडमिंटन
अधिक माहितीसाठी उमेदवार अधिसूचना पाहू शकतात…
लिंक : https://sbi.co.in/documents/77530/43947057/230724-1_Detailed+ADD_23.07.2024_Sportsperson.pdf/237658d5-4c74-5e64-f412-3c96beec858b?t=1721739332794
SBI Recruitment For Sportspersons: शेवटची तारीख :
अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, १४ ऑगस्टपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.