SBI SCO Recruitment 2023: भारतीय स्टेट बँक स्पेशालिस्ट कॅडर (SCO) पदांवर भरती २०२३चे अधिसुचना जाहीर केली आहे. बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या इच्छूक आणि पात्र उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. इच्छूक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर Sbi.co.inला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाइन आवेदन प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसबीआय एससीओ भरती २०२३ अधिसुचनेनुसार, या भरती मोहिमेंतर्गत एकूण २८ रिक्त पदांची भरती केली जाईल. योग्य उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटद्वारे २१ जून २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

SBI SCO Vacancy 2023 येथे पहा भरतीचे तपशील

व्हाईस प्रेसिडेंट (ट्रान्सफॉर्मेशन): १ पद
सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह – प्रोग्राम मॅनेजर: ४ पद
सिनियर स्पेशलएक्झिक्युटिव्ह – गुणवत्ता आणि प्रशिक्षण (इनबाउंड आणि आउटबाउंड): १ पद
सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह – कमांड सेंटर: ३ पद
सीनियर वाइस प्रेसिडेंट आणि हेड (मार्केटिंग): १ पद
असिस्टेंट जनरल मॅनेजर (मार्केटिंग) / चीफ मॅनेजर (मार्केटिंग): १८ पद
एकूण पद – २८

हेही वाचा – १२ वी पास उमेदवारांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

कोण करु शकते अर्ज?

मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर असावा. संबधित विषयामध्ये एमबीए,पीजीडीएमसह बीई किंवा बी टेक किंवा सीए केलेल असावे. याशिवाय अनुभव देखील महत्त्वाचा आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगळी असून त्याची सविस्तर माहिती तुम्ही अधिसुचनेत वाचू शकता.

निवड प्रक्रिया

नियमित पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड शॉर्ट लिस्टिंग आणि मुलाखतआणि कॉन्टॅक्टच्या पदांवर मुलाखत आणि सीटीसीबाबत झालेल्या संवादाच्या आधारावर होईल.

जाणून घ्या किती मिळेल पगार ( वार्षिक)

व्हाइस प्रेसिडेंट (ट्रान्सफॉर्मेशन): ५०.०० लाख ते ७५.०० लाख रुपये ( वार्षिक)
सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह (प्रोग्राम मॅनेजर): – २२.०० लाख ते ३० लाख रुपये( वार्षिक)
सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह गुणवत्ता आणि प्रशिक्षण (इनबाउंड आणि आउटबाउंड): २२.०० लाख ते रु. ३०.०० लाख रुपये( वार्षिक)
सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह (कमांड सेंटर): २२.०० लाख ते ३०.०० लाख रुपये( वार्षिक)

हेही वाचा –IBPS मध्ये मेगाभरती, तब्बल ८६०० जागांसाठी भरती सुरु, जाणून घ्या कसा करावा अर्ज

कॉन्ट्रॅक्टल पद

सीनियर व्हाइस प्रेसिडेंट आणि हेड (मार्केटिंग): रु ५० लाख-५५ लाख (CTC ७०:३० च्या प्रमाणात निश्चित वेतन आणि परिवर्तनीय वेतनात विभागले जाईल) ( वार्षिक)

रेग्युलर पद

असिस्टेंट जनरल मॅनेजर सीनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल– V – ८९८९०-२५००/२- ९४८९०-२३७०/२ – १००३५० रुपये( वार्षिक)

चीफ मॅनेजर (मार्केटिंग) मॅनेजमेंट ग्रेड स्केल– IV: रुपये ७६०१०-२२२०/४-८४८९०-२५००/2- 89890 रुपये( वार्षिक)

SBI SCO Recruitment 2023 अधिसुचना १ -https://sbi.co.in/documents/77530/36548767/ADD_SCO_09_CCG.pdf/96a6a819-6004-fe14-91bf-5aec8b6a7532?t=1685602159193

SBI SCO Recruitment 2023 अधिसुचना २ – https://sbi.co.in/documents/77530/36548767/ADV_CONTACT+CENTRE.pdf/5005c0bd-e9f7-d452-989b-a33469e1cbb4?t=1685598959923

आता अर्ज करा आणि क्लिक करा – https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2023-24-10/apply

अर्ज शुल्क

सामान्य/ ईडब्ल्यूएस/ ओबीसी उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क आणि सुचना शुल्क ( प्रत्येक अर्जासाठी) ७५० रुपये आहे आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जनजाती/ पीडब्ल्यूबीडी उमेदवारांकडून कोणतही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi sco recruitment 2023 eligibility application fee more for 28 vacancies snk
Show comments