SBI SCO Recruitment 2023 : बॅंकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टेट बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर भरती २०२३ –

पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर / मॅनेज

एकूण पदसंख्या – ४२

हेही वाचा- १० वी, १२ वी पास आणि पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! टपाल विभागात ‘या’ पदांच्या १८९९ जागांसाठी भरती सुरु

शैक्षणिक पात्रता –

डेप्युटी मॅनेजर : कोणत्याही शाखेतील पदवी + भारतीय सैन्यात कॅप्टनच्या रँकपेक्षा कमी नसलेले अधिकारी किंवा भारतीय नौदल/ हवाई दलात किमान ५ वर्षांच्या कमिशन्ड सेवेसह समकक्ष रँक. किंवा सहाय्यक अधीक्षक/ उपअधीक्षक/ सहाय्यक कमांडंट/ भारतीय पोलीस/ निमलष्करी दलातील उप कमांडंटच्या दर्जापेक्षा कमी नसलेले अधिकारी अशा दलातील अधिकारी म्हणून किमान ५ वर्षांची सेवा.

मॅनेजर : कोणत्याही शाखेतील पदवी + कमीत कमी १० वर्षांच्या कमिशन्ड सेवेसह भारतीय लष्करातील मेजर पदापेक्षा कमी किंवा भारतीय नौदल/ वायुसेनामधील समतुल्य दर्जाचे अधिकारी. किंवा भारतीय पोलीस/ निमलष्करी दलातील उप-अधीक्षक/ उप कमांडंटच्या दर्जापेक्षा कमी नसलेले अधिकारी अशा दलातील अधिकारी म्हणून किमान १० वर्षांची सेवा.

वयोमर्यादा –

खुला, ओबीसी, मागासवर्गीय – २५ ते ४० वर्षे.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी/ EWS – ७५० रुपये.
  • मागासवर्गीय/ PWD – फी नाही.

अधिकृत बेवसाईट – https://sbi.co.in/

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ९ नोव्हेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ नोव्हेंबर २०२३

स्टेट बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर भरती २०२३ संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा –

https://drive.google.com/file/d/1kn7FQkrb7Esh8moTVlm4h984IK-c7pk-/view