प्रवीण निकम

मित्रांनो नमस्कार, दिवाळीच्या सुट्ट्या संपवून किंवा काही जण त्या सुट्टीचा आस्वाद घेत नव्या शैक्षणिक सत्रात प्रवेश करत असतील. कालच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खूप सुंदर वाक्य वाचनात आले.

Job Opportunity Recruitment of Scientist B Posts
नोकरीची संधी: ‘सायंटिस्ट-बी’ पदांची भरती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
Job Opportunity Maharashtra State Cooperative Bank Recruitment career news
नोकरीची संधी: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती
fake doctor defrauded old woman
मुंबई: तोतया डॉक्टरकडून शस्त्रक्रियेच्या नावाखाली वयोवृद्ध महिलेची लाखोंची फसवणूक
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
What Nana Patole Said About Devendra Fadnavis ?
Nana Patole : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील? ते निवडून येणारच नाहीत..”; नाना पटोले काय म्हणाले?

‘नेतृत्व का गुण सिखाया नहीं जा सकता, यह केवल सिखा जा सकता है!’

मग असं लक्षात आलं की, उच्च शिक्षणाच्या वाटचालीमध्ये सर्वच युवक-युवतींसाठी जी जमेची बाजू असते, ती बाजू म्हणजे नेतृत्वकौशल्य. हे कौशल्य मला येईल, जमेल म्हणून ते घडणार नसून त्यासाठी मला स्वत:लादेखील प्रयत्नपूर्वक काही गोष्टी कराव्या लागणार आहे. हे कौशल्य मला अट्टहासाने शिकावं लागणार आहे. खूपदा प्रश्न पडतो, कसं बरं हे कौशल्य शिकावं? कोण आहे जे मला हे कौशल्य शिकवेल? असं कौशल्य शिकण्यासाठी काही फेलोशिप स्कॉलरशिप असू शकते का? असे प्रश्न कदाचित तुम्हालाही पडत असतील. तर आजचा लेख खासकरून त्यासाठीच.

भविष्यातील सर्जनशील आणि कृतिशील नेतृत्व घडवणारी एक संस्था म्हणजे, डिसोम फाऊंडेशन! या संस्थेची स्थापना बिरेन भुटा यांनी केली आहे. ‘बिरेन’ हे टाटा स्टीलचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या इंटरव्हेंशनचे प्रमुख, एका खासगी वाहिनीचे सादरकर्ता आणि शैक्षणिक व नेतृत्वाच्या आव्हानांची खोलवर समज असणारे व्यक्तित्व. सामाजिक विज्ञानातील अंडरग्रॅज्युएट अभ्यास पूर्ण केल्यानंतर, भुटा यांनी अतिशय प्रतिष्ठित अशा IIM (आय.आय.एम.) मधून व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर त्यांनी पत्रकार आणि त्यानंतर टाटा समुदायाच्या कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी विभागाचा प्रमुख म्हणून झारखंड, मध्य प्रदेशमधल्या दुर्गम भागात आदिवासी समुदायासाठी काम केले होते. या विविध अनुभवांमुळे त्याचा जाणिवेचा परीघ विस्तारत गेला. भारतात वाढलेल्या बिरेन यांना वैयक्तिक अनुभवातून शैक्षणिक संसाधने आणि संधींमधील विषमतेची तीव्र जाणीव होत होती, विशेषत: ग्रामीण आणि वंचित विद्यार्थी शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून खूप दूर आहेत हे त्यांनी अनुभवले होते. त्यामुळे त्यांच्या कामाच्या सुरुवातीला या विषमतेला संबोधित करण्याची आणि शिक्षणाच्या सामर्थ्याचा उपयोग सशक्तीकरणासाठी करण्यासाठी आपण काही तरी करायला हवं. या अनुभवांतूनच भुटांचा डिसोम लीडरशिप स्कूलचा दृष्टिकोन आकाराला आला. बिरेन भुटांनी स्थापन केलेले हे संस्थान शिक्षण आणि नेतृत्व विकासाच्या क्षेत्रात एक परिवर्तनकारी दृष्टिकोन देण्यासाठी, विशेषत: ग्रामीण आणि वंचित समुदायातील तरुणांचे नेतृत्व संगोपन व विकास करण्यावर काम करणारी संस्था आहे आणि या संस्थेचीच ही ‘डिसोम फेलोशिप’.

पारंपरिक शैक्षणिक मॉडेल्स ‘डिसोम फेलोशिप’ ही नेतृत्व आणि वैयक्तिक विकासाच्या व्यापक पैलूंना महत्त्व देणारी ही फेलोशिप असून, वंचित क्षेत्रातील तरुणांसाठी सक्रियपणे नेतृत्व विकसन करणारी, न्याय, समानता, सहानुभूती आणि एकता समृद्ध करण्यासाठी आपल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी सक्षम लीडर्स घडविणारी, लोकशाहीचा जिवंत अनुभव वर्षभराच्या फेलोशिपच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करते. ‘डिसोम फेलोशिप’ इतर संस्थांपेक्षा वेगळी असणारी संस्था या कारणाने देखील आहे की, नेतृत्व प्रशिक्षणासाठीची नवीन आणि रंजक पद्धत यात वापरली जाते. यात समुदाय सहभाग, वैयक्तिक मार्गदर्शन आणि एक नवोन्मेषी अभ्यासक्रम यासोबतच भारतभरातील समाजसेवा प्रकल्पांमध्ये सहभागी असणाऱ्या विविध व्यक्ती व संस्था यांचा प्रत्यक्ष अनुभव यामधून विद्यार्थ्यांना मिळत असतो. प्रकल्पांमध्ये शैक्षणिक प्रोग्राम्स, आरोग्य उपक्रम आणि पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांचा विचार केला जातो. अभ्यासक्रमात तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांचा समावेश आहे.

या फेलोशिपची निवड प्रक्रिया व याबाबतच्या अटी-शर्ती –

१. तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.

२. या फेलोशिपसाठी वयाची व क्षेत्राची अट नाही. २१ वर्षांपासून ते ६० वर्षापर्यंत कोणीही कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती यासाठी पात्र आहे.

३. भाषेचे माध्यम याबाबत पूर्णत: सूट असून भाषिक अडसर या फेलोशिपबाबत नाही.

४. साधारणपणे १५ महिन्यांची निवासी फेलोशिप असून भारतभर यानिमित्ताने विद्यार्थी प्रवास करतात.

५. फेलोशिपचा संपूर्ण खर्च संस्था उचलते व गरजेनुसार विद्यार्थ्यांना मानधन (छात्रवृत्ती) देण्यात येते.

६. कोणत्याही प्रकारचे शारीरिक अपंगत्व असणारी व्यक्तीदेखील या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात.

‘डिसोम फेलोशिप’ समृद्ध आणि आकर्षक आहे. विविध शिक्षणपद्धतींचा वापर करत विद्यार्थ्यांना या फेलोशिपच्या माध्यमातून भविष्यातील नेतृत्वासाठी तयार केले जाते. तुमच्यातील नेतृत्वकौशल्य जर विकसित करायचे असेल आणि यानिमित्ताने भारतभ्रमंती करत अनुभवसमृद्ध होऊ इच्छित असाल तर नक्की या ‘डिसोम फेलोशिप’चा विचार कराल. सध्या डिसोम फेलोशिप २०२५-२६ तयारी सुरू असून तुम्ही यासाठी ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकता. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन मुलाखत प्रक्रिया पार पडली जाईल. जानेवारीमध्ये यामधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे एक शिबीर घेण्यात येईल व त्यानंतर अंतिम निवड प्रक्रिया होऊन ‘डिसोम फेलोशिपचे’ फेलोज निवडले जातील. अधिक माहितीसाठी त्यांच्या वेबसाइटची लिंक खाली दिलेली आहे. https:// disomfoundation.org

Story img Loader