प्रवीण निकम
इनलाक्स शिवदासानी फाऊंडेशन १९७६ पासून, इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती ४८० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना यूएसए, यूके आणि युरोपियन संस्थांमध्ये पूर्ण-वेळ मास्टर्स, एमफिल किंवा डॉक्टरेट प्रोग्राममध्ये करण्यासाठी मदत करते. यात प्रोग्राम, ट्यूशन, राहण्याचा खर्च, आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्यांचे एकेरी विमान भाडे इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ज्याचा खर्च अंदाजे वरऊ १००,००० पर्यंत असतो जो संस्था उचलते. उच्च शिक्षणासाठी मदत जाणाऱ्या या फाऊंडेशनची इम्पीरियल कॉलेज, लंडन, रॉयल कॉलेज ऑफ आर्ट ( RCA), लंडन, केंब्रिज विद्यापीठ (केंब्रिज ट्रस्ट), किंग्ज कॉलेज लंडन (पीएचडी विद्यार्थ्यांसाठी*) आणि हर्टी स्कूल, बर्लिन अशा विविध नामांकित विद्यापीठांसोबत संयुक्त-शिष्यवृत्ती व्यवस्था आहे.

इनलाक्स शिवदासानी फाऊंडेशन ही कायमच विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाटचालीत आर्थिक साहाय्य करण्यास सज्ज असणारी एक संस्था. आपण मागच्या एक लेखात या फाऊंडेशनच्या काही शिष्यवृत्त्यांबद्दल माहिती घेतली आहे परंतु आजची माहिती अधिक खास म्हणावी लागेल, कारण ही शिष्यवृत्ती आहे पीएचडी विद्यार्थ्यांसाठी.

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
success story Heartbroken lover become officer after his girlfriend reject him
VIDEO: स्पर्धा परीक्षेत नापास झाला अन् प्रेयसी सोडून गेली; पुढच्या वर्षी पास होत तिच्याच घरासमोर लावल्या ७५ तोफा
Meta AI in whatsapp
Meta AI in WhatsApp: आता AI थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर; वाट्टेल ते विचारा, ते सगळं सांगेल! वाचा नेमकं वापरायचं कसं?
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
neet student marathi news
‘शिक्षणाच्या फॅक्टरी’तून पळून गेलेल्या एका मुलाची सगळ्यांचे डोळे उघडणारी गोष्ट
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
IIM Mumbai recruitment 2024
IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये नोकरीची संधी
Students still stay away from education due to financial reasons
चौकट मोडताना: आर्थिक कारणांमुळे अजूनही विद्यार्थी दूरच

इनलाक्स शिवदासानी फाऊंडेशन चार दशकांहून अधिक काळ संशोधन आणि शिष्यवृत्तीच्या नावीन्यपूर्ण कार्याला पाठिंबा देत आहे. इनलाक्स रिसर्च ट्रॅव्हल ग्रँट नोंदणीकृत पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती आहे. भारतीय विद्यापीठांमधील पीएचडीचे विद्यार्थी जे मानवता आणि सामाजिक शास्त्रांचे (Humanities and Social Sciences) विद्यार्थी आहेत ते त्यांच्या या पीएचडी अभ्यास कालावधीत त्यांच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक साहित्य गोळा करण्यासाठी, नवीन संशोधन कोणते व कोणत्या प्रकारे परदेशात घडत आहे ते पाहण्यासाठी किंवा अगदी त्यांच्या विषयातील परदेशी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी परदेशातील संस्थांना अल्पकालीन भेटी देतात. हे सर्व त्यांच्या क्रमित अभ्यासक्रमाचा व भविष्यकालीन वाटचालीसाठीचा महत्त्वाचा भाग असला तरी कमी कालावधीसाठी व केवळ भेटी देणे किंवा संशोधन जाऊन घेण्यासाठी सहसा शिष्यवृत्ती दिली जात नाही. परंतु मी वर म्हटल्याप्रमाणे ही पीएचडीचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. हे महत्त्व जाणूनच इनलाक्स शिवदासानी फाऊंडेशन खास या मुद्द्याचा विचार करूनच ही शिष्यवृत्ती दरवर्षी पात्र विद्यार्थ्यांना देत असतात.

अर्थात या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही निकष देखील आहेत जसे की,

१. विद्यार्थी भारतीय विद्यापीठात किमान दोन वर्षे नोंदणीकृत पीएचडी उमेदवार असावा. (परंतु अर्जाच्या वेळी तीन वर्षांपेक्षा जास्त नाही)

२. बॅचलर (ऑनर्स) आणि मास्टर्स स्तरावर प्रथम श्रेणी पदवी पर्याप्त असावा.

३. १ जानेवारी १९८९ रोजी किंवा नंतर जन्मलेले असावा.

याशिवाय अर्थात ही शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे विद्यार्थी भारतीय असणे व भारतीय पासपोर्टधारक असणे क्रमप्राप्त आहेच. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जदार विद्यार्थी हा केवळ आणि केवळ मानवता आणि सामाजिक विज्ञान क्षेत्रात पीएचडी करणारा असावा. या अभ्यासक्रमासाठीची अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै २०२४ असणार आहे.

अर्जाचा फॉर्म हा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्यात विद्यार्थ्यांना संशोधनाच्या विषयावर लिखित कामाचा अनुभव (३०००-५००० शब्द) अर्जासोबत लिहून द्यायचा आहे. यात पीएचडी प्रबंधाचा भाग म्हणून हा प्राधान्याने मसुदा अध्याय (संपूर्ण भाष्य आणि दस्तऐवजीकरणासह) वाचन सूची, सर्वेक्षणे किंवा प्रबंधासाठी केलेल्या इतर कोणत्याही कामाच्या तपशीलांसह असावा. परदेशातील संसाधन व्यक्ती किंवा संस्थेशी सकारात्मक संवादाचा पुरावा आणि केलेल्या व्यवस्थेचा करार. यासोबत अर्जदार विद्यार्थ्याने त्याच्या पीएचडी पर्यवेक्षकाकडून क्षमता, लक्ष आणि त्यांच्या देखरेखीखाली केलेल्या कामातील प्रगती. उमेदवाराला परदेशात जाणे का आवश्यक आहे? याविषयी शिफारस पत्र द्यावयाचे आहे. शिवाय परदेश दौऱ्यासाठी लागणारा निधी इतर कोणत्याही स्राोतातून मिळू शकत नाही. हे देखील त्यात नमूद असणे आवश्यक आहे. हे पीएचडी पर्यवेक्षकाच्या शिफारस पत्रापेक्षा वेगळे इतर दोन दोन संदर्भ पत्र व पासपोर्ट प्रत (पहिले आणि शेवटचे पान) ढऊा स्वरूपात विद्यार्थ्याने अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे ही शिष्यवृत्ती संस्था ग्रंथालयात संशोधन करण्यासाठी आणि क्षेत्रातील तज्ज्ञांना भेटण्यासाठी जास्तीत जास्त ३ महिन्यांसाठी आर्थिक सहाय्य करते व हे अनुदान दिल्यानंतर ९ महिन्यांच्या आत त्याचा वापर करणे आवश्यक आहे. याबाबत आधी माहिती तुम्हाला संकेतस्थवरून प्राप्त होईलच. (https:// inlaksfoundation. org/ irtg/ inlaks- travel- and- research- grant) उमेदवाराने दोन-स्तरीय निवड प्रक्रियेतून जाणे अपेक्षित आहे. या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यावर सादर केलेल्या लेखी पुराव्याच्या आधारे शॉर्ट-लिस्टिंगची पहिली फेरी व नंतर व्यक्तिश: किंवा तज्ञांच्या पॅनेलसह एक मुलाखत अशी मुलाखत प्रक्रिया घडते.

मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांना ऑगस्ट २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात सूचित केले जाईल. अंतिम मुलाखती सप्टेंबर २०२४ च्या सुरुवातीला होतील. उमेदवार कोणत्याही वर्षात ‘इनलॅक्स रिसर्च अँड ट्रॅव्हल ग्रँट’ किंवा ‘इनलॅक्स-किंग्स इंडिया इन्स्टिट्यूट स्टुडंटशिप’साठी अर्ज करू शकतो. अर्जाचा फॉर्म https:// inlaksfoundation. org/ irtg/ inlaks- travel- and- research- grant या संकेतस्थळावर मिळू शकेल. तसेच संलग्नकांसह पूर्ण केलेला अर्ज toichchaporia@inlaksfoundation. org वर ईमेल करता येईल. मानवता आणि सामाजिक शास्त्रांचे ( Humanities and Social Sciences) मध्ये पीएचडी करणाऱ्यासाठी ही सुवर्णसंधी आहे असे मला वाटते ज्याचा लाभ तुम्ही अर्थातच घ्याल अशी अशा व्यक्त करतो.