प्रवीण निकम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याच्या आधुनिक काळात विज्ञान-तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. अशावेळी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मुलींची उच्च शिक्षणात रूची वाढवणे, ही खरी काळाची गरज आहे. याच उद्देशाने सरकारमार्फत मुलींसाठी विविध शिष्यवृत्ती योजना उपलब्ध असतात. मात्र, याविषयी कित्येकांना माहिती नसल्याने उच्च शिक्षणासाठी फायदा होऊ शकत नाही. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध संस्था, फाऊंडेशन आणि कंपन्यांकडून अनेक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. अर्जदारांना त्यांची आर्थिक गरज, शैक्षणिक पात्रता, नेतृत्वगुण आणि शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कामगिरीच्या आधारावर या शिष्यवृत्ती मिळतात. मुलींच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहभागासाठीच जगभरात स्टेम विषयांच्या व्यावसायिक क्षेत्रात महिलांचा सहभाग कमी आहे. पूर्वीच्या काळचा विचार केला असता, विशिष्ट चौकटीत साचेबंद स्वरूपात मुली करिअर क्षेत्राची निवड करायच्या; परंतु स्टेम क्षेत्राची प्रगती आज उत्तरोत्तर वाढत आहे. तरी देखील यात मुलींची संख्या अजूनही कमी प्रमाणात आहे. या लेखात ‘स्टेम’साठीच्या (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) शिष्यवृत्तीसाठीची माहिती समजून घेणार आहोत.

हेही वाचा >>> बृहन्मुंबई महानगरपालिकेत HR पदासाठी होणार भरती! ८१ हजारापर्यंत मिळेल पगार, आजच करा अर्ज

स्टेम अभ्यासक्रमाचे विशेष हे की विद्यार्थी ‘आउट ऑफ द बॉक्स’ विचार करायला लागतो. त्यामुळे, साहजिकच अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचार आणि समस्या सोडवण्याच्या आंतरशाखीय दृष्टिकोनाच्या विकासाला प्रोत्साहन मिळते. यासर्व गोष्टी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. असंख्य महाविद्यालये आणि संस्था स्टेम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी लवचिकदृष्ट्या अभ्यासक्रम तयार करते. परदेशात हे प्रमाण अधिक आढळून येते. परदेशात ‘स्टेम’चा अभ्यास करण्याचे मुख्य कारण म्हणजे ते ऑफर करत असलेल्या अभ्यासोत्तर कामाच्या संधींची संख्या जास्त आहेत. यासाठी विद्यार्थ्यांस कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या पद्धतीने पुढे जायचे आहे, हे ठरवणे ही पहिली पायरी असते. इतकेच नाही, तर जे विद्यार्थी संशोधन आणि त्या आधारित विकासाच्या, प्रयोगाभिमुख क्षेत्राकडे जाण्याचा निर्णय घेऊ इच्छितात. अशांसाठी जागतिक पातळीवरील आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांद्वारे अभ्यास पूर्ण करण्याची संधी उपलब्ध असते.

यात, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असताना संशोधन सहायक म्हणून देखील तुम्ही काम करू शकता. तुमचा जसजसा ‘स्टेम’ क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्णत्वाकडे जातो, तसतसे शिकवण्याची पद्धत आणि शिकण्याच्या पद्धतीमध्येही बदल होतो. एखाद्या थिअरीकडून मूळ सरावाकडे हा बदल होतो. बहुतेक स्टेममधील कोर्सेस अशाच प्रकारे डिझाइन केलेले आहेत. ‘युनेस्को’चे मध्यंतरी केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले, की ‘स्टेम’ विषयांचा अभ्यास करणाऱ्या महिला विशेषत: कमी आहेत. संगणक, विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विषयांत फक्त १९ टक्के, तर भौतिक विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये अनुक्रमे ३९ टक्के आणि ३७ टक्के. त्यामुळेच, ब्रिटिश कौन्सिलतर्फे ‘स्टेम’मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्यात भारतीय मुलींसाठी राखीव जागा देखील आहेत. शिष्यवृत्तीचे हेच मूळ उद्दिष्ट असते की, तळागाळातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देऊन नवनिर्मिती करणे. जेणेकरून ‘स्टेम’ करिअर क्षेत्रात महिलांचा सहभाग जास्त वाढला जाईल आणि त्यांनादेखील रोजगार निर्माण होईल.

हेही वाचा >>> SSB Odisha Recruitment 2024: लेक्चरर पदांसाठी मोठी भरती! वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता; जाणून घ्या अर्ज कसा भरावा…

यासाठी कोणत्या पात्रता किंवा निकष लावले जातात तर यासाठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. तर, पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, संशोधन करत असल्यास मान्यताप्राप्त विद्यापीठाचा प्रवेश असावा. किमान इंग्रजी विषयाची प्राथमिक जाण असावी. आता ही शिष्यवृत्ती नक्की कोणाकोणाला मिळू शकते तर जे अल्प उत्पन्न गटात मोडतात, तसेच ज्यांना आर्थिक दृष्ट्या मदतीची गरज आहे. तसेच, शिक्षण सुरू असल्यास जो उमेदवार यू.के. विद्यापीठातील पदव्युत्तर स्तरासाठी सर्व अभ्यासक्रम पूर्ण करेल किंवा पुढील तीन वर्षांत पीएच.डीचे सर्व घटक पूर्ण करेल.

यू.के. विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यास/संशोधनासाठी आवश्यक अशी इंग्रजीची सक्षमतेची पातळी गाठू शकेल. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या जाणीव असून, ‘स्टेम’ आधारित कार्यक्षेत्राविषयी आवड असेल. या शिष्यवृत्तीचा फायदा हा की यू.के.ची सर्व विद्यापीठे जागतिक दर्जाची असून, ‘स्टेम’ विषयात आघाडीवर आहेत. शिष्यवृत्तीमुळे आर्थिक साहाय्य मिळते. यात ट्यूशन फी, स्टायपेंड, प्रवास खर्च, व्हिसा आणि आरोग्य इत्यादींचा समावेश असतो. यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना तुम्हाला पुढील शैक्षणिक वर्षासाठी लवकरच ब्रिटिश कौन्सिलच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येईल. यात तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज करू शकता. मात्र, तुमची निवड दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार होईल. याशिवायही इतरही खासगी कंपन्या व संस्थांमार्फत मुलींसाठीच्या विशेष शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scholarships for students in stem free scholarship for students scholarship for higher education education scholarships zws
Show comments