छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे. (महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत स्वायत्त संस्था) मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीतील ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) अभ्यासक्रमांसाठी दर ( Quacquareli Symbonds) World Ranking 200 च्या आत रँकिंग असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतला असेल किंवा प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना ‘महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ सन २०२४-२५ अंतर्गत विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शाखानिहाय/ अभ्यासक्रमनिहाय शिष्यवृत्तीसाठी जागांचा तपशिल सोबतच्या तक्त्यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सदर शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष –

(१) उमेदवार व उमेदवाराचे आई-वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत.

(२) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अद्यावत (सन २०२४) मधील दर (Quacquarelli Symonds) World Ranking 200 च्या आत असावे.

(३) उमेदवाराच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक (सन २०२३-२४) एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखापेक्षा जास्त नसावे.

या विषयीची विस्तृत माहिती https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.

हेही वाचा >>> Success Story : २५० रुपये पगाराच्या नोकरीपासून ते फॅशन प्रॉडक्शन हाऊस सुरू करण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

कमाल वयोमर्यादा : पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ३५ वर्षे, पीएच्.डी. अभ्यासक्रमासाठी ४० वर्षे.

योजने अंतर्गत विद्यार्थ्यास मिळणारे लाभ – शिक्षण फी, परतीच्या प्रवासासह विमान प्रवास भाडे, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्याने केलेला प्रत्यक्ष खर्च इ. सर्व मिळून एका विद्यार्थ्यामागे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी प्रतीवर्षी रु. ३० लाखाच्या मर्यादेत तर पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी रु. ४० लाखाच्या मर्यादेत शाखा/अभ्यासक्रमनिहाय मार्गदर्शक तरतुदीनुसार परदेशी शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल.

ऑनलाइन भरलेल्या अर्जाची मूळ प्रत, मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकीत प्रतींसह पडताळणीसाठी पुणे येथील सारथी मुख्य कार्यालयात बालचित्रवाणी, सी.टी. सर्व्हे क्र. १७३ बी/१, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे – ४११ ००४ दि. ३१ जुलै २०२४ पर्यंत (कार्यालयीन वेळेत) सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सादर करावीत.https://sarthi-maharashtragov.in/

ऑनलाइन अर्ज https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर दि. ३० जुलै २०२४ पर्यंत करावेत. आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रे ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करणे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scholarships for study abroad study abroad scholarships zws
Show comments