शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई (SCI Mumbai) येथे लेखा सहाय्यक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण नऊ जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.shipindia.com/ या वेबसाईटवरून पाठवू शकणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी २०२४ आहे, तर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
SCI Mumbai Bharti 2024: नोकरी ठिकाण – मुंबई</p>
SCI Mumbai Bharti 2024: पदाचे नाव – लेखा सहाय्यक
SCI Mumbai Bharti 2024: शैक्षणिक पात्रता
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (CA-Inter) ची इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी.
किंवा
द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (CMA-Inter) ची इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी.
हेही वाचा…NHAI Recruitment 2024: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये पदवीधरांसाठी भरती; असा करा अर्ज…
SCI Mumbai Bharti 2024: पगार
पहिले वर्ष: २२,५००
दुसरे वर्ष: २५,०००
तिसरे वर्ष : (जर कॉन्ट्रॅक्ट एक्सटेन्ड झाला तर) २७,५००
SCI Mumbai Application 2024: ॲप्लिकेशनसाठी अर्ज करताना लक्षात ठेवण्याच्या महत्वाच्या गोष्टी :
या भरतीकरिता जरी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तरीही अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या साइटवर पाठवून द्या. पात्र उमेदवारांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.