​SEBI Officer Grade A Jobs 2023: सिक्योरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवार सेबीच्या अधिकृत साईट sebi.gov.inच्या माध्यमातून अधिकारी ग्रेड ए पदावर अर्ज करु शकतात. नोंदणी प्रक्रिया २२ जून २०२३ पासून सुरू झाली आहे जी ९ जुलै २०२३ला समाप्त होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

​SEBI Officer Grade A Recruitment 2023 रिक्त पदभरती :

ही भरती मोहिम असिस्टंट मॅनेजर पदाकरिता २५ पदांसाठी आहे.

​SEBI Officer Grade A Recruitment 2023 योग्यता :

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्यातील पदवीधर असणे आवश्यक आहे.

हेही वाचा – रेल्वेत नोकरीची मोठी संधी! अप्रेंटीस ट्रेनी पदांसाठी भरती सुरु, कोण करू शकते अर्ज, जाणून घ्या

​SEBI Officer Grade A Recruitment 2023 वयोमर्यादा :
अधिसुचनेनुसार अर्ज करणारे उमेदवारांचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे.

अधिसुचना -https://www.sebi.gov.in/sebi_data/careerfiles/jun-2023/1687350526589.pdf

​SEBI Officer Grade A Recruitment 2023 अशी होईल निवड :
उमेदवाराची निवड तीन टप्यांमध्ये होईल. पहिल्या टप्यात ऑनलाइन स्क्रिनिंग परिक्षा ज्यामध्ये १०० गुणांचे दोन पेपर समाविष्ट आहेत. दुसऱ्या टप्यात ऑनलाइन परिक्षेमध्ये प्रत्येकी १०० गुणांच दोन पेपर समाविष्ट आहेत. तिसऱ्या टप्यात उमेदवाराची मुलाखत होइल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्यात निगिटेव्ह मार्किंग( प्रश्नसाठी दिलेल्या गुणांच्या १/४) होईल.

हेही वाचा – IBPS RRBमध्ये ८ हजारपेक्षा जास्त पदांच्या भरतीसाठी अर्जाच्या मुदतीत वाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

SEBI Officer Grade A Recruitment 2023 अर्ज शुल्क :
अनारिक्षत/ओबीसी /ईडब्ल्यूएस श्रेणीच्या उमेदवारांसाठी १०० रुपये १८ टक्के जीएसटी आणि एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी श्रेणीचे उमेदवारांसाठी १०० रुपये आणि १८ टक्के जीएसटी अर्ज शुल्क भरावे लागेल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi officer grade a recruitment 2023 apply for 25 assistant manager posts snk
Show comments