SEBI Recruitment 2024 : सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीअंतर्गत ‘कार्यकारी संचालक’ [Executive director] पदावर नोकरीसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी नोकरीचा अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष आणि नोकरीचा अर्ज कसा करायचा अशी सर्व आवश्यक माहिती पाहावी. तसेच, अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ती पाहावी.
SEBI Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या
सेबी अंतर्गत कार्यकारी संचालक या पदासाठी एकूण १ जागेवर भरती करण्यात येणार आहे.
SEBI Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
कार्यकारी संचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे CA / CS /CFA / CWA / LLB / फायनान्स क्षेत्रात MBA/MMS सह स्पेशलायझेशन असावे.
तसेच, अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अर्थशास्त्रात [Economics] पदव्युत्तर शिक्षण [Post Graduation] असावे.
SEBI Recruitment 2024 : वेतन
कार्यकारी संचालक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास दरमहा साधारण ४.८९ लाख ते ५.८५ लाख रुपयांदरम्यान वेतन देण्यात येईल.
SEBI Recruitment 2024 – सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अधिकृत वेबसाईट लिंक –
https://www.sebi.gov.in/index.html
SEBI Recruitment 2024 – अधिसूचना –
https://www.sebi.gov.in/sebiweb/other/careerdetail.jsp?careerId=346
SEBI Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
कार्यकारी संचालक या पदासाठी उमेदवारास नोकरीचा अर्ज करायचा असल्यास त्यांनी तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना नोकरीच्या अधिसूचनेत सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज पाठवावा.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ४० ते ५५ वर्षे अशी वयोमर्यादा ठेवलेली आहे.
उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी पाठवणे अनिवार्य आहे.
नोकरीचा अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १३ जुलै २०२४ अशी आहे.
वरील नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी सेबीच्या म्हणजेच सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केली आहे.