हवामान बदलांचा परिणाम शेतीवर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. पर्यावरणाची स्थिती भविष्यात विदारक होण्याची शक्यता आहे. परिणामस्वरूप कृषी क्षेत्रात कुशल व अकुशल नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय शेतीला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे. या परिस्थितीचा भारतीय शेतीला गेली ५० दशके फायदा झाला. परंतु गेली दोन दशके हवामान बदलांमुळे शेती उत्पादनात खूप चढ-उतार पाहावयास मिळत आहेत. भविष्यामध्ये ही परिस्थिती अजूनच विदारक होण्याची शक्यता आहे. या सर्वांचा विचार करता शेतीमध्ये कुशल व अकुशल नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये आपण पारंपरिक करिअर संधी पाहणार आहेत.

पारंपरिक म्हणजे शब्दश: न घेता शासकीय संज्ञेप्रमाणे यातील पदांचा नामनिर्देशक केलेला आहे. म्हणून आपण पारंपरिक शब्द वापरला आहे.

महाराष्ट्र शासनामध्ये सरळसेवेने काही पदे भरली जातात-

१) कृषी शास्त्रज्ञ –

या पदांसाठी पदव्युत्तर शिक्षण गरजेचे असून शासकीय परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. हे पद शासकीय तसेच खासगी क्षेत्रात सुद्धा आहे. त्याचे नाव फक्त रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑफिसर असे आहे.

हेही वाचा >>> एमपीएससी मंत्र : गट ब सेवा पूर्व परीक्षा – भूगोल

२) शेती अधिकारी –

या पदासाठी एम.पी.एस.सी.मार्फत परीक्षा घेतली जाते. यामध्ये विस्तार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडलाधिकारी इत्यादी पदांची भरती केली जाते.

३) कृषी सहाय्यक –

या पदाला कृषी पदवीधारक पात्र असून मागील १० वर्षांत शासनाने याची भरपूर पदे भरली आहेत. पुढील पाच वर्षात आणखी पदे रिक्त होत असून कृषी पदवीधरांना चांगली संधी आहे

४) उद्यानविद्या पर्यवेक्षक –

सर्व महानगरपालिका, नगरपालिका तसेच शासनाच्या सेवेत हे पद भरले जाते. यासाठी पदवीधर उमेदवार पात्र आहे.

५) वनस्पती संवर्धन ( Plant Breeder) –

सर्व खासगी व शासकीय सेवेत नवीन बियाणे निर्माण करणे, तयार झालेल्या बियाण्यांची गुणवत्ता तपासणी हे या पदाचे मुख्य काम आहे. यासाठी कृषी पदवीधर आवश्यक आहे.

बँक व्यवस्थापनातीलकृषी सेवेच्या संधी

सध्या भारतीय अर्थव्यवस्था विकसनशील गटात मोडत आहे. विकसित भारत २०४७ या कालबद्ध कार्यक्रमात बँकिंग क्षेत्राचे भरीव योगदान होणार आहे. शेती वित्तपुरवठा येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशावेळी या सर्व बाबींची पूर्तता करण्यास कुशल मनुष्यबळ गरजेचे आहे. ती पदे कृषी शिक्षणातून भरली जाणार आहेत.

१) कृषी विशेषज्ञ अधिकारी,

२) P. O. (प्रोबेशनरी अधिकारी),

३) कनिष्ठ कृषी सहकारी,

४) ग्रामविकास अधिकारी,

५) परिविक्षाधीन अधिकारी

कृषी विज्ञान केंद्र

भारतामध्ये ७३१ कृषी विज्ञान केंद्र असून यातील महाराष्ट्रात ५० कृषी विज्ञान केंद्र असून यामध्ये –

१) वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख,

२) विषय विशेषज्ञ अधिकारी,

३) शेती अधिकारी

ही पदे भरली जातात.

महाराष्ट्र कृषी विद्यापीठस्तरावरील सेवेच्या संधी

महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठे असून यामध्ये विविध पदसंख्या भरली जाते.

१) सहाय्यक प्राध्यापक,

२) वरिष्ठ संशोधक सहाय्यक,

३) कनिष्ठ संशोधक सहाय्यक,

४) कृषी सहाय्यक,

५) शेती अधिकारी

खासगी क्षेत्रातील संधी

भारतीय शेतीमध्ये खासगी क्षेत्राचे सुद्धा बहुमोल योगदान आहे. यामध्ये बियाणे खते व औषधे पुरवठा करणाऱ्या प्रामुख्याने संख्या आहेत. भारतीय बियाणे कंपनीचे मार्केट २०२२ मध्ये ६३० कोटी रुपयांचे होते ते २०२८ मध्ये अंदाजे १३०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. तसेच औषधे व खते कंपनीचे सुद्धा मार्केट २०३० पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे यामध्ये काम करणाऱ्यांची संख्या सुद्धा दीडपट वाढण्याची शक्यता आहे.

१) रिसर्च आणि डेव्हलपमेंट अधिकारी,

२) शेती अधिकारी,

३) वनस्पती ब्रिडर,

४) शेती अधीक्षक,

५) मार्केटिंग मॅनेजर,

६) मार्केटिंग अधिकार,

७) विक्री अधिकारी,

८) विक्री प्रतिनिधी

परदेशी नोकरीच्या संधी

जसे इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परदेशी नोकरीच्या संधी आहेत. तशा कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत. परंतु यामध्ये स्थानिक भाषा येणे महत्त्वाचे आहे. सध्या महाराष्ट्र सरकार व जर्मनी, इस्रायल या देशासोबत सामंजस्य करार करून तेथे नोकरीचे संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु परंतु भविष्यात यामध्ये खूप मोठा बदल होऊन यात तीन पट वाढ होण्याची शक्यता आहे.

परदेशातील काही प्रमुख पदे

१) कृषी विशेषज्ञ

२) शेती विकास अधिकारी

३) संशोधक सहाय्यक इ.

इच्छा असेल तर मार्ग दिसेल या म्हणीप्रमाणे शेती क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत. त्या संधीचे सोने कसे करणार यावर अवलंबून आहे. पुढील लेखामध्ये आपण आधुनिक कृषी क्षेत्रातील करिअरच्या संधी पाहणार आहोत.

उद्यामेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथै:

न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा:

केवळ इच्छा व्यक्त करून नव्हे तर कष्ट केल्यानेच कार्य पूर्ण होते. म्हणून वरील संस्कृत श्लोकाच्या अर्थाप्रमाणे आपण कष्टाला पर्याय ठेवू नये.

(लेखक सातारा येथील लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत)

sachinhort.shinde@gmail.com

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skilled and unskilled job opportunities in the agricultural sector zws