Career In Gaming: आजच्या काळात तरुणांमध्ये गेम खेळण्याची क्रेझ वाढली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ऑनलाइन गेम खेळायला आवडते. त्यामुळे गेमिंग क्षेत्र आता अब्जावधी डॉलरचे झाले आहे. मात्र, गेमिंग म्हणजे फक्त टाईमपास असं आजही अनेकांना वाटतं. मात्र, आपली आवड ही करिअरमध्ये रुपांतर करण्याची संधी आता गेमिंग क्षेत्रसुद्धा देते. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल २००९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेला थ्री इडियट्स या चित्रपटातील आर. माधवननं फरहान कुरेशी ही भूमिका साकारून अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटामधील आर. माधवनच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले. या चित्रपटातील त्याचा ‘अब्बा नहीं मानेंगे’ हा डायलॉग प्रसिद्ध आहे. मात्र, शेवटी त्यानं इंजिनिअरिंग सोडून आपल्या आवडीला निवडलं आणि फोटोग्राफर बनला. विशेष म्हणजे एखादा इंजिनिअरही नाही कमावणार एवढा पैसा त्याला फोटोग्राफी करून मिळाला. दरम्यान, सध्या असाच एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये एका गेमरला आयआयटी पदवीधरापेक्षा जास्त पगार मिळतो, अशी माहिती सुपरगेमिंग या गेम स्टुडिओचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी रॉबी जॉन यांनी दिली आहे.

बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) सारख्या लोकप्रिय व्हिडीओ गेमसह टॉप एस्पोर्ट्स खेळाडूंचे वेतन आता करोडोंमध्ये जात आहे आणि भारतीय टेलिव्हिजनवर त्याचा चाहतावर्ग वाढत आहे. इतकेच नाही तर एस्पोर्ट्स, आशियाई खेळ आणि ऑलिम्पिकमध्येही त्यांचा समावेश करून मुख्य प्रवाहात आले आहेत. एस्पोर्ट्स खेळाडू, विशेषत: जे आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा व्यावसायिक संघांचा भाग म्हणून स्पर्धा करतात, ते वर्षाला १५ लाख ते ३० लाख रुपये कमवू शकतात, असे सुपरगेमिंग या गेम स्टुडिओचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी रॉबी जॉन यांनी नमूद केले आहे. ते पुढे असंही सांगतात की, सर्वाधिक कमाई करणारे गेमर्स ५० लाखांच्या पुढे जाऊ शकतात. यामध्ये स्पॉन्सर आणि स्पर्धेतील बक्षिसे जोडून ही रक्कम एक कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.

Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
quantum chip Willow solves in 5 minutes
Quantum Chip :सुपर कॉम्प्युटरलाही हजारो वर्षे लागतील; पण गूगलची ‘ही’ नवी चिप ५ मिनिटांत उत्तर देईल
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
World Championship Chess Tournament Dommaraju Gukesh defeats Ding Liren sport news
जगज्जेतेपदाच्या दिशेने गुकेशचे पाऊल; ११व्या डावात डिंगवर मात
Success Story kalyani and dinesh Engineer couple
Success Story: इंजिनिअर जोडप्याने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; वर्षाला कमावतात करोडो रुपये

आपण जर आयआयटी पदवीधराच्या सरासरी वेतन पॅकेजशी याची तुलना केली तर प्लेसमेंट रिपोर्ट्सनुसार, आयआयटी पदवीधरांचा सरासरी वार्षिक पगार १० लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आहे. परंतु, कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग यांसारख्या उच्च-मागणी क्षेत्रातील पदवीधर बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे किंवा चांगल्या अर्थसहाय्यित स्टार्टअप्सद्वारे नियुक्त केल्यास अधिक कमाई करू शकतात. यानुसार आयआयटी बॉम्बेमधून पदवीधरांना ऑफर केलेला सरासरी एकूण पगार २०२२-२०२३ मध्ये १६.६६ लाख प्रतिवर्ष होता आणि CTC (कंपनीला खर्चा) वर आधारित सरासरी पगार २०२२-२०२३ मध्ये २१.८२ लाख प्रतिवर्ष होता. आयआयटी बॉम्बेच्या २०२२-२३ च्या प्लेसमेंट अहवालानुसार सर्वात कमी पॅकेज ५,४३,००० रुपये होते.

आयआयटी पदवीधारकांचे वेतन आणि गेमर्सच्या वेतनातील फरक पाहिल्यानंतर असे दिसते की, ज्या गेम्सना एकेकाळी एक विशिष्ट छंद मानले जात होते, तेच आता एक करिअर बनले आहे. इंजिनिअर किंवा आयआयटी पदवीधारकांना हे गेमर्स क्षेत्र टक्कर देत असल्याचं सुपरगेमिंग या गेम स्टुडिओचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी रॉबी जॉन सांगतात.

हेही वाचा >> Indian Bank: बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी; इंडियन बँकेत थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी

आता गेमिंग या क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. या क्षेत्रात विद्यार्थी गेम डिझायनिंग किंवा गेम डेव्हलपरसारखे कोर्स करून दरमहा लाखोंची कमाई करू शकतात. जर तुम्ही तयार केलेला गेम लोकप्रिय झाला तर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. गेमिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक चांगले कोर्सेसही उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांची किंमत दरवर्षी ५० हजार ते १ लाखांपर्यंत असू शकते.

Story img Loader