Career In Gaming: आजच्या काळात तरुणांमध्ये गेम खेळण्याची क्रेझ वाढली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ऑनलाइन गेम खेळायला आवडते. त्यामुळे गेमिंग क्षेत्र आता अब्जावधी डॉलरचे झाले आहे. मात्र, गेमिंग म्हणजे फक्त टाईमपास असं आजही अनेकांना वाटतं. मात्र, आपली आवड ही करिअरमध्ये रुपांतर करण्याची संधी आता गेमिंग क्षेत्रसुद्धा देते. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल २००९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेला थ्री इडियट्स या चित्रपटातील आर. माधवननं फरहान कुरेशी ही भूमिका साकारून अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटामधील आर. माधवनच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले. या चित्रपटातील त्याचा ‘अब्बा नहीं मानेंगे’ हा डायलॉग प्रसिद्ध आहे. मात्र, शेवटी त्यानं इंजिनिअरिंग सोडून आपल्या आवडीला निवडलं आणि फोटोग्राफर बनला. विशेष म्हणजे एखादा इंजिनिअरही नाही कमावणार एवढा पैसा त्याला फोटोग्राफी करून मिळाला. दरम्यान, सध्या असाच एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये एका गेमरला आयआयटी पदवीधरापेक्षा जास्त पगार मिळतो, अशी माहिती सुपरगेमिंग या गेम स्टुडिओचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी रॉबी जॉन यांनी दिली आहे.
गेमिंग फक्त टाईमपास नव्हे! इंजिनिअर्स, आयआयटी पदवीधरांपेक्षा जास्त कमवतायत गेमर्स
Gaming Industry: एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये एका गेमरला आयआयटी पदवीधरापेक्षा जास्त पगार मिळतो, अशी माहिती सुपरगेमिंग या गेम स्टुडिओचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी रॉबी जॉन यांनी दिली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-08-2024 at 14:26 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skilled gamers earning equal to iit graduates career in gaming career tips srk