Success Story: २२ महिला अधिकारी, २३५ फ्लाइट कॅडेट्सच्या (flight cadets) प्रशिक्षणाची यशस्वी सांगता करण्यासाठी भारतीय वायुसेना अकादमी, डुंडीगल, तेलंगणा येथे एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नाव कमिशनिंग समारंभ (Commissioning Ceremony) असे आहे. हा समारंभ अधिकारी बनलेल्या फ्लाइट ऑफिसरच्या आयुष्यातील एक अद्भुत क्षण असतो. कारण- या समारंभात फ्लाइंग ऑफिसरना त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत रँक मिळते. कमिशनिंग समारंभात एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी पदवीधर कॅडेट्सना रँक प्रदान करतात. या समारंभात भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलातील आंतरराष्ट्रीय अधिकारीही उपस्थित असतात.

या समारंभामध्ये एक फ्लाइंग ऑफिसरदेखील उपस्थित होता. त्याने या समारंभात रँक मिळवून आपले लहानपणीचे स्वप्न पूर्ण केले. हवाई दलात IAF फ्लाइंग ऑफिसरची नियुक्ती मिळविलेल्या या तरुणाचे नाव पुलकित रात्रा, असे आहे. त्याच्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात अनेक अडथळे आले. तरीही त्याने कधीच हार मानली नाही आणि त्याचा प्रवास पूर्ण करून दाखवला. स्वप्ने पाहणाऱ्या अशा अनेक तरुणांसाठी त्याची कहाणी म्हणजे एक आशेचा किरण आहे. चला तर पाहूया त्याचा प्रेरणादायी प्रवास.

हेही वाचा…Success Story: परदेशातील नोकरी सोडून ‘त्यांनी’ भारतात उभा केला व्यवसाय; पाहा कोट्यवधींची कंपनी उभारणाऱ्या व्यावसायिकाचा ‘हा’ प्रवास

पुलकितचा जन्म जम्मूमधील एका सामान्य कुटुंबात झाला. पुलकित रात्राचे लहानपणापासूनच हवाई दलात IAF फ्लाइंग ऑफिसर बनण्याचे स्वप्न होते. पण, त्याचा प्रवास आव्हानांनी भरलेला होता. त्याच्या वडिलांनी कपडे शिवून कुटुंबाचे पालनपोषण केले आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या पाठीशी उभे राहिले. अनेक समस्यांचा सामना करूनही पुलकितने आपले स्वप्न सोडले नाही. हे सगळे पाहून, पुलकित रात्राने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात कोणतीही कसर सोडली नाही. फ्लाइंग ऑफिसर बनलेल्या पुलकित रात्राची एनसीसी स्पेशल एंट्रीद्वारे एअर फोर्सच्या जानेवारी २०२३ च्या कोर्ससाठी निवड झाली आणि अखेर भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर बनून, त्याने आपल्या कुटुंबाला त्याच्याबद्दल अभिमान वाटेल असा आनंद अनुभवण्याची संधी मिळवून दिली.

शैक्षणिक पात्रता –

व्यक्तीकडे एनसीसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच पदवी आणि ६० टक्के गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणितासह १२वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

इतर फ्लाइंग ऑफिसर्स –

या समारंभात फ्लाइंग ऑफिसर हॅप्पी सिंग याने पायलट कोर्समध्ये ओव्हरऑल ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याला राष्ट्रपती फदक आणि हवाई दलप्रमुख स्वोर्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. त्याच वेळी फ्लाइंग ऑफिसर तौफिक रझा याने ग्राउंड ड्युटी ऑफिसर्स कोर्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याला राष्ट्रपती सन्मानचिन्हही प्रदान करण्यात आले.