​South Central Railway Jobs 2023: साऊथ सेंट्रल रेल्वेने भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. ज्यानुसार रेल्वेमध्ये ज्युनिअर टेक्निकल असोसिएट पदांवर भरती जाहीर केली. या भरती मोहिमेंतर्गत उमेदवार एसीसीआरच्या अधिकृत वेबसाईटवर scr.indianrailways.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकता. या पदावर भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भरती मोहिमेंतर्गत साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये ज्युनिअर टेक्निकल असोसिएटचे ३५ पदांची भरती केली जाईल. ज्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरच्या १९ पदांसाठी इलेक्ट्रिकलच्या १० पदांसाठी आणि एल अँड टी यासाठी ६ पदांवर भरती होईल.

आवश्यक शैक्षणिक योग्यता

या भरती मोहिमेंसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. शिवाय उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल्स / इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिकल/ इलेक्ट्रीकल/ इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा असला पाहिजे. अर्ज करण्यासाठी जनरल कॅटगरीमधील उमेदवार ६० टक्के गुणांनी उतीर्ण असला पाहिजे. तर एसी आणि एसटी वर्गातील उमेदवरांसाठी ५० टक्के गुणांनी उतीर्ण असला पाहिजे.

हेही वाचा – DRDO Recruitment 2023: डीआरडीओमध्ये ६२ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया

वयोमर्यादा

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या जनरल कॅटगरीतील उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्ष असले पाहिजे. ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी जास्तीच्या वयामध्ये ३६ वर्षांपर्यंत वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

अशी होईल निवड

उमेदवारांची निवडा पात्रता, अनुभव आणि व्यक्तिमत्व / बुद्धिमत्तेच्या आधारावर केली जाईल.

अधिसूचना – https://scr.indianrailways.gov.in/uploads/files/1685961214725-JTA_Notifn2023.pdf

हेही वाचा – SBI मध्ये होणार भरती! ‘इतका’ मिळेल पगार; परीक्षेशिवाय होईल निवड, फक्त ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

अर्ज शुल्क

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क भरावा लागेल. भरतीसाठी अर्ज शुल्क ५०० भरावे लागेल. एससी/ एसटी/ ओबीसी/महिला/ अल्पसंख्यामध्ये इडब्ल्यूएस श्रेणीमध्ये उमेदवारांसाठी अर्ज शुल्कामध्ये २५० रुपये निश्चित केली आहे. शुल्क भरण्यासाठी एफए आणि सीएओ/ एससीआर/ एसीच्या प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी आणि वरिष्ठ कार्मिक अधिकारी (अभियांत्रिकी), प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी कार्यालय, चौथा मजला, कार्मिक विभाग, रेल निलयम दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद, पिन- ५०००२५ यांचे सचिव यांच्या नावे डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात SC मध्ये केले पाहिजे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South central railway recruitment 2023 35 vacancies for junior technical associate post snk