SSB Recruitment 2023: सशस्त्र सीमा बल विभागाद्वारे हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट कमांडंट आणि इतर विविध पदांच्या भरती २०२३ साठी नोंदणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार SSB भरती २०२३ साठी अधिकृत वेबसाइट- ssbrectt.gov.in वर १८ जून २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात. सहाय्यक कमांडंट, सब इन्स्पेक्टर (SI), असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI), हेड कॉन्स्टेबल (HC), आणि कॉन्स्टेबलच्या १६५६ विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे. १०वी, १२वीच्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची मोठी संधी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

SSB भरती २०२३: रिक्त जागांचा तपशील

हेड कॉन्स्टेबल HC (तंत्रज्ञ) – ९१४
कॉन्स्टेबल ट्रेड्समन – ५४३
असिस्टंट कमांडंट (पशुवैद्यकीय) – १८
उपनिरीक्षक SI (तांत्रिक) – १११
एएसआई (पॅरामेडिकल स्टाफ) – ३०
एएसआई (स्टेनो) – ४०

SSB भरती २०२३: पदनिहाय शैक्षणिक पात्रता

हेड कॉन्स्टेबल (एचसी): मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी (मॅट्रिक) किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
कॉन्स्टेबल (ट्रेड्समन): मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी (मॅट्रिक) किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एएसआई (पॅरामेडिकल स्टाफ): मान्यताप्राप्त बोर्डातून विज्ञान शाखेसह बारावी पास आणि संबंधित ट्रेडमधील पदवी.
एएसआय (स्टेनो): मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता बारावी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
असिस्टंट कमांडंट (पशुवैद्यकीय): पशुवैद्यकीय शास्त्रात बॅचलर पदवी.
उपनिरीक्षक (टेक): मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमा.

SSB भरती २०२३:वयोमर्यादा

असिस्टेंट कमांडंट (पशु चिकित्सा): २३ – २५ वर्ष
सब इंस्पेक्टर (टेक): २१ – ३० वर्ष
एएसआई (पॅरामेडिकल स्टाफ): २० – ३० वर्ष
एएसआई (स्टेनो): १८ – २५ वर्ष
हेड कॉन्स्टेबल (एचसी): १८– २५ वर्ष
कॉन्स्टेबल (ट्रेड्समैन) : १८– २५ वर्ष

हेही वाचा- DRDO Recruitment 2023: DRDO मध्ये विविध पदांसाठी होणार भरती, मुलाखती आधारे होईल उमेदवाराची निवड, ‘असा’ भरा अर्ज

SSB भरती २०२३: निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असेल.

SSB भरती २०२३: शुल्क

सामान्य, इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) उमेदवारांना १०० रुपये भरावे लागतील. तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला उमेदवारांना शुल्क भरण्यासाठी सूट देण्यात आली आहे.

SSB भरती २०२३: जाणून घ्या किती मिळेल पगार

  • असिस्टेंट कमांडंट (पशु चिकित्सा): ५६,१०० – १,७७,५०० रुपये (पे लेव्हल – १०)
  • उप निरीक्षक (तकनीकी): ३५,४०० – रुपये १,१२,४०० रुपये (पे लेव्हल – ६)
  • एएसआई (पॅरामेडिकल स्टाफ): २९,२०० – रुपये ९२,३०० रुपये (पे लेव्हल -५)
  • एएसआई (स्टेनो): २९,२०० – रुपये ९२,३०० रुपये (पे लेव्हल – ५)
  • हेड कॉन्स्टेबल (एचसी): २५,५०० – ८१,१०० रुपये (पे लेव्हल -४)
  • कॉन्स्टेबल (ट्रेड्समैन): २१,७०० – ६९,१०० (पे लेव्हल-३)

हेही वाचा – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती, ५ जूनपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष

SSB भरती २०२३ अधिसूचना – http://ssbrectt.gov.in/default.aspx

SSB भरती २०२३: अर्ज कसा करावा

  • SSB भरती २०२३ साठी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराने दिलल्या पायाऱ्यांचे व्यवस्थित पालन करा.
  • ssbrectt.gov.in येथे SSB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर, ‘SSB भरती २०२३ अधिसूचना’ लिंकवर क्लिक करा.
  • सूचना पूर्णपणे वाचा आणि इच्छित अर्ज भरण्यासाठी पुढे जा.
  • तुमचे वैयक्तिक तपशील आणि शैक्षणिक तपशील देऊन अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.
  • SSB भरती २०२३ अर्ज डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रत प्रिंट करा.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ssb recruitment 2023 aspiring candidates can apply online for total 1658 vacancies by ssbrectt gov in till june 18 10th pass can apply snk