SSC CGL Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) एकत्रित पदवी स्तर (CGL) परीक्षा २०२४ साठी अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती मोहिम विविध घटनात्मक संस्था, वैधानिक संस्था आणि न्यायाधिकरणांसह भारत सरकारची अनेक मंत्रालये, विभाग आणि संस्थेच्या गट ‘बी’ आणि गट ‘सी’च्या विविध पदांसाठी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गंत सुमारे १७,७२७ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छूक आणि पात्र उमेदवार आता अधिकृत SSC वेबसाइटद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात.

SSC CGL Recruitment 2024 -केव्हा करू शकता अर्ज?

अर्जाची प्रक्रिया २४ जून २०२४ रोजी सुरू झाली आणि ती २४ जुलै २०२४ पर्यंत सुरू राहील. उमेदवारांना शेवटच्या क्षणी कोणतीही समस्या टाळण्यासाठी त्यांचे अर्ज अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करण्यास प्रोत्साहित केले जाते. फी भरण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२४ आहे.

What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Economist Amartya Sen
“भारत हिंदू राष्ट्र नाही”, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निवडणूक विश्लेषण!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
NHAI recruitment 2024
NHAI recruitment 2024 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत नोकरीची मोठी भरती! जाणून घ्या…
Jayam Ravi wife Aarti deletes all Instagram posts
ऐश्वर्या रायच्या को-स्टारच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?अभिनेत्याच्या पत्नीने डिलीट केले फोटो, १५ वर्षांपूर्वी केला प्रेमविवाह
IIM Mumbai recruitment 2024
IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये नोकरीची संधी
What Ajit pawar Said?
Maharashtra Assembly Budget 2024-2025: अजित पवारांनी केली ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा, कोण ठरणार पात्र? किती मिळणार निधी?

SSC सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये टियर-I (संगणक आधारित परीक्षा) आयोजित करेल, त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये टियर-II परीक्षा होईल. याशिवाय, 10 ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यासाठी एक सुधारणा विंडो (application form adjustments) उपलब्ध असेल.

हेही वाचा – यूपीएससी सूत्र : लोकसभेतील खासदारांचा शपथविधी अन् आणीबाणीची ४९ वर्ष, वाचा सविस्तर…

SSC CGL Recruitment 2024 – महत्त्वाच्या तारखा

१) अधिसूचना जारी – २४ जून २०२४
२) ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या तारखा -२४ जून २०२४ ते २४ जुलै २०२४
३) अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आणि वेळ -२४ जुलै २०२४ (२३:००)
४) ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ – २५ जुलै २०२४(२३:००)
५) अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो – १० ऑगस्ट २०२४ ते ११ ऑगस्ट २०२४ (२३:००)
६) टियर-१ परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक- सप्टेंबर-ऑक्टोबर, २०२४
७) टियर-२ परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक – डिसेंबर, २०२४

SSC CGL Recruitment 2024 पात्रता निकष:

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) अखेर बहुप्रतीक्षित संयुक्त पदवी स्तर (CGL) परीक्षा 2024 साठी इच्छूक उमेदवारांनी पात्रता निकषांची पूर्तता करत आहात का हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

शैक्षणिक पात्रता (१ ऑगस्ट २०२४ पर्यंत)
एसएससी सीजीएल परीक्षेसाठी किमान शैक्षणिक पात्रता पुर्ण करण्यासाठी पात्र उमेदवाराकडे एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेची बॅचरल पदवी असावी. तसेच विशिष्ट पदांसाठी अतिरिक्त शैक्षणिक पात्रता असू शकते. या अधिसूचनेमध्ये प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेल्या आवश्यकतांचा तपशील आहे, त्यात सांख्यिकी (Statistics), वाणिज्य (Commerce), संगणक विज्ञान (Computer Science) किंवा विशिष्ट पदांसाठी कायदा यासारख्या विषयांचा समावेश आहे.

हेही वाचा – IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये नोकरीची संधी

SSC CGL Recruitment 2024 वयोमर्यादा

SSC CGL परीक्षेत बसण्याची वयोमर्यादा तुम्ही कोणत्या श्रेणीशी संबंधित आहात त्यानुसार बदलते. येथे एक सामान्य वयोमर्यादा दिली आहे.
मान्य श्रेणी: (१ ऑगस्ट २०२४ रोजी उमेदवारांचे वय १८ ते ३२ वर्षांच्या दरम्यान असावे.
राखीव प्रवर्ग: सरकारी नियमांनुसार अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC), माजी सैनिक, अपंग व्यक्ती (PwD) आणि इतर यांसारख्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सवलत उपलब्ध आहे.

उच्च वयोमर्यादेच्या पलीकडे वयोमर्यातेच सवलत दिली आहे.
१) अनुसूचित जाती (SC)/अनुसूचित जमाती (ST) – ५ वर्षे
२)ओबीसी – ३ वर्ष
३) PwBD (अनारिक्षित) – १० वर्षे
४ )PwBD (OBC) – १३ वर्षे
५)PwBD (SC/ST) – १५ वर्षे
6 ) माजी सैनिक (ESM) -अंतिम तारखेनुसार वास्तविक वयापासून सादर केलेल्या लष्करी सेवेच्या कपातीनंतर – ३ वर्षे
८) कोणत्याही परकीय देशाबरोबर शत्रुत्वादरम्यान किंवा संघर्ष क्षेत्रात संरक्षण कर्मचारी अपंग झाल्यास आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना सेवेतून मुक्त करण्यात आले असेल तर – ३ वर्ष
९) कोणत्याही परकीय देशाबरोबर शत्रुत्वादरम्यान किंवा संघर्ष क्षेत्रात संरक्षण कर्मचारी अपंग झाल्यास आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना सेवेतून मुक्त करण्यात आले असेल तर (SC/ST) -८ वर्षे

SSC CGL Recruitment 2024 – नागरिकत्व

बऱ्याच सरकारी परीक्षांप्रमाणे, SSC CGL साठी पात्र होण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे

SSC CGL Recruitment 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी थेट लिंक – https://ssc.gov.in/login

SSC CGL Recruitment 2024 अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी थेट लिंक – https://ssc.gov.in/api/attachment/uploads/masterData/NoticeBoards/Notice_of_CGLE_2024_06_24.pdf

हेही वाचा – NHAI recruitment 2024 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत नोकरीची मोठी भरती! जाणून घ्या…

महत्वाचे मुद्दे

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता निकषांची पूर्तता केल्याचे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी ही भरती महत्त्वपूर्ण संधी देते.

  • भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही विसंगतीमुळे अपात्रता येऊ शकते.
  • अधिसूचना विशिष्ट पदांसाठी अतिरिक्त पात्रता आवश्यकता निर्दिष्ट करू शकते, जसे की, पदवी किंवा विशिष्ट संगणक कौशल्ये. अधिसूचना काळजीपूर्वक वाचा
  • अर्ज करण्यासाठी पोर्टलवर थेट प्रवेशासाठी उमेदवार एसएससी वेबसाइटला भेट देऊ शकतात
  • तुम्हाला स्वारस्य असलेल्या विशिष्ट पोस्टसाठी पात्रता निकष समजून घेण्यासाठी सूचनेचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा.