SSC CHSL Notification 2023: नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुचना आहे. कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission -SSC) एकत्रित संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा (Combined Higher Secondary Level Exam – CHSL) २०२३ साठी अधिसुचना जाहीर केली आहे, ज्यातंर्गत एकूण १६०० पदांसाठी भरती होणार आहे. उमेवदवारांना सल्ला दिला जातो की, नियोजित तारखेपूर्वी अर्ज करायचा असेल तर आताच अर्ज करावा. कारण त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्विकारला जाणार नाही.

कर्मचारी निवड आयोगातर्फे या भरतीसाठी ग्रुप सीच्या पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी १२वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये / विभागांमध्ये/ कार्यलयांमध्ये विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, आणि डेटा एंट्री ऑपरेटर अशा पदांसाठी केली जाईल.

job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा

अधिसुचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ९ मे पासून सुरू झाली आहे. तसे अर्जाची शेवटची तारीख ८ जून २०२३ आहे. यानंतर कोणत्याही उमेदवारांचा अर्ज स्विकारला जाणारी नाही. उमेदवारांनी हे जाणून घ्यावे की फी भरण्याची अंतिम मुदत १० जून २०२३ रोजी संपेल. सुधारणा करण्याची विंडो १४ जून आणि १५ जून २०२३ रोजी सक्रिय होईल.

हेही वाचा – RBI Recruitment 2023: रिझर्व्ह बँकेत अधिकारी होण्याची संधी, २९१ पदांसाठी होणार भरती, असा भरा अर्ज

अर्ज करण्यासाठी पात्रता

भरतीसाठी सर्व उमेदवार अर्ज करू शकतात जे १२वी पास आहे. यासाठी ते उमेदवार देखील अर्ज करू शकतात जे १२ वी परीक्षा देणार आहे किंवा दिली आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी वयोमर्यादा १-०८-२०२३पर्यंत निश्चित केली आहे. २-८-१९९५च्या आधी आणि १-०८ २००५ च्या नंतर जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे. विविध पदांसाठी वरील वयोमर्यादेत सुट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी किमान आवश्यक वय १८ वर्षे आहे आणि कमाल वयोमर्यादा २७ वर्षे आहे. वयाच्या शिथिलतेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला (https://ssc.nic.in/) भेट देऊन तपासू शकता.

अधिकृत अधिसुचना वाचा – https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/Notice_chsl_09052023.pdf

SSC CHSL  Tier १ परीक्षा २ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२३ दरम्यान घेतली जाईल. भरती परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) स्वरूपात घेतली जाईल.  Tier १ परीक्षा उत्तीर्ण करणारे Tier २ रीक्षेस बसण्यास पात्र असतील.

हेही वाचा- Railway Recruitment 2023: 10वीसह ITI उतीर्ण असाल तर परीक्षेशिवाय मिळू शकते रेल्वेत नोकरी! पगारही मिळेल चांगला

असा भरावा अर्ज

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर CHSL Recruitment लिंकवर क्लिक करा.
  • वैयक्तिक तपशील भरून सबमिटवर क्लिक करा.
  • फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
  • शेवची पुन्हा एकदा सबमिटवर क्लिक करा आणि एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.”