SSC JHT Recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) ज्युनिअर हिंदी ट्रान्सेलटर, ज्युनिअर ट्रान्सेलटर आणि सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर भरती परिक्षा, २०२३ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. २२ ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर २०२३ आहे.
SSC JHT भरती २०२३ रिक्त जागा तपशील
SSC JHT अर्ज फॉर्म दुरुस्ती विंडो १३ आणि १४ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल. एसएससीच्या या भरती मोहिमेद्वारे संस्थेमध्ये ज्युनिअर हिंदी ट्रान्सेलटर, ज्युनिअर ट्रान्सेलटर आणि सिनिअर हिंदी ट्रान्सलेटरच्या 3०७ जागा भरल्या जातील
- ज्युनिअर हिंदी ट्रान्सेलटर – २१ पद
- ज्युनिअर ट्रान्सेलटर अधिकारी – १३ पद
- ज्युनिअर ट्रान्सेलटर – २६३ पद
- सिनिअर ट्रान्सलेटर : ०१ पद
- सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर : ०९ पद
SSC JHT भरती २०२३ अर्ज शुल्क
अर्जदारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंग व्यक्ती (PWBD) आणि आरक्षणासाठी पात्र माजी सैनिक यांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
हेही वाचा – IBPSमध्ये १४०२ पदांसाठी होणार भरती: अर्जाच्या मुदतीमध्ये वाढ, ‘ही’ आहे शेवटची तारीख
SSC JHT भरती २०२३ वयोमर्यादा
SSC JHT भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावेत. म्हणजेच, उमेदवाराचा जन्म ०२-०८-१९९३ पूर्वी झालेला नसावा आणि ०१-०८-२००५ नंतर झालेला नसावा.
SSC JHT भरती २०२३ साठी अर्ज कसा करावा
- सर्वप्रथम ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होम पेजवरील नोंदणी लिंकवर जा.
- अर्ज करण्यासाठी नोंदणी करा आणि लॉग इन करा.
- तपशील भरा, शुल्क भरा आणि अर्ज जमा करा.
- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
SSC JHT भरती २०२३ अधिकृत अधिसूचना –
Click to access FINAL_NOTICE_JHT_2023_22082023.pdf
SSC JHT भरती २०२३ वयोमर्यादा
केंद्रीय सचिवालय, सशस्त्र दलात ज्युनिअर ट्रान्सेलटर अधिकारी (JTO) या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल-६ नुसार ३५,४०० रुपये ते १,१२,४०० रुपये वेतन मिळेल
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय, विभाग/संस्थेमध्ये ज्युनिअर हिंदी ट्रान्सेलटर अधिकारी (JHT) / ज्युनिअर ट्रान्सेलटर अधिकारी (JTO) ज्युनिअर ट्रान्सेलटर (JT) या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना स्तर-६ नुसार ३५,४०० रुपये ते १,१२,४०० रुपये वेतन मिळेल.
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय, विभाग/संस्थेमध्ये सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर (SHT) / सिनिअर ट्रान्सलेटर या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना स्तर-७ नुसार ४४,९०० ते १,४२,४०० रुपये वेतन मिळेल.