SSC : कर्मचारी निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन)ही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये आणि अधीनस्थ कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी कर्मचारी भरती करते. कर्मचारी निवड आयोगाने(SSC) आपली नवीन वेबसाइट लॉन्च केली आहे. एसएससीची वेबसाइट आता ssc.gov.in आहे. नवीन वेबसाइट सुरू करण्याची घोषणा करताना आयोगाने असेही म्हटले आहे की, नवीन वेबसाइटवरील लिंकद्वारे जुनी वेबसाइट ssc.nic.in कार्यरत राहील.
या संदर्भात जारी केलेल्या SSC निवेदनात म्हटले आहे: “कर्मचारी निवड आयोगाला १७.०२.२०२४ रोजी सुरू केलेल्या नवीन वेबसाइटची घोषणा करताना अभिमान वाटतो. पण विद्यमान वेबसाइट देखील नवीन वेबसाइटवरील लिंकद्वारे वापरता येईल.
हेही वाचा – BEL Trainee Bharti 2024: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनिअरच्या ५१७ पदांसाठी भरती! ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
आयोगाने उमेदवारांना नवीन वेबसाइटवर नवीन एकदा नोंदणी (ओटीआर) करण्यास सांगितले आहे कारण एसएससी वेबसाइटच्या जुन्या आवृत्तीवर पूर्वी केलेली नोंदणी रद्दबातल राहील. नवीन वेबसाइटवर ‘उमेदवारांसाठी > विशेष सूचना > OTR भरण्यासाठी सूचना’ या विभागांतर्गत एक-वेळच्या नोंदणीसाठी तपशीलवार सूचना उपलब्ध आहेत, असे निवेदनात सांगितले आहे.
“भविष्यातील परीक्षांसाठी सर्व अर्ज नवीन वेबसाइटद्वारे ऑनलाइन सबमिट करणे आवश्यक आहे, म्हणजे, फक्त ssc.gov.in,,” असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – दहावी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; ‘या’ विभागात १०६ रिक्त जागांसाठी भरती; जाणून घ्या तपशील
नवीन SSC वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर नवीनतम माहितीसह एक सूचना फलक आहे, अर्जांसाठी काही लिंक, निकाल, उत्तरपत्रिका आणि प्रवेशपत्र आणि SSC कॅलेंडर याबाबत माहिती दिसत आहे. मुख्यपृष्ठाच्या तळाशी, एसएससीमध्ये ‘परीक्षेनुसार ब्राउझ करा’ विभाग देखील आहे. त्यात एसएससीच्या सर्व परीक्षांबाबत माहिती मिळेल.