SSC MTS 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एसएससी अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल) पदाच्या रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली होती. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार ४,८८७ रिक्त जागांसाठी ही भरती होणार होती, जी आता वाढवून ६,१४४ रिक्त जागांसाठी करण्यात आली आहे. सीआयबीसी (CIBC) आणि सीबीएन (CBN मधील) ३,४९९ हवालदारांच्या रिक्त जागांची एकूण संख्या आता ९,५८३ आहे. इच्छुक व पात्र उमेदवार या भरतीसाठी ssc.gov.in वरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर एसएससी एमटीएस परीक्षेअंतर्गत कोणत्या पदावर मिळणार नोकरी? कधी होणार परीक्षा, कशी होणार उमेदवाराची निवड याबाबदल सविस्तर जाणून घेऊ या..
तसेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने एका वेगळ्या अधिसूचनेद्वारे माहिती दिली आहे की, एसएससी, एमटीएस व हवालदार परीक्षा २०२४ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज ३ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवली आहे. आधीच्या अधिसूचनेत याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. अर्जाची अंतिम मुदत वाढवल्यामुळे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा यांसारख्या पात्रता अटी निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारखेत बदल करण्यात आला आहे. आयोगाच्या अलीकडील घोषणेनुसार, पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख ३१ जुलै रोजी होती, ती ३ ऑगस्ट करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना अर्जात काही दुरुस्ती करायची असल्यास त्यासाठी विंडो १६ व १७ ऑगस्टला रात्री ११ पर्यंत चालू राहील. एसएससी एमटीएस परीक्षा २०२४ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे.
SSC MTS 2024 : वयोमर्यादा
मल्टी टास्किंग अर्ज करणारा उमेदवार किमान १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा.
हवालदार पदासाठी, उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावी.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
SSC MTS 2024 : शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता दहावी (मॅट्रिक) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
SSC MTS 2024 : निवड कशी होईल ?
उमेदवारांना एसएससी एमटीएस परीक्षा २०२४ साठी अर्ज शुल्क १०० रुपये भरावे लागतील. आरक्षणासाठी पात्र अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PwBD) आणि Exservicemen (ESM) साठी अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.
उमेदवारांची निवड करण्यासाठी आयोग संगणक आधारित परीक्षा (CBE) आयोजित करेल.
ज्यांनी हवालदाराच्या रिक्त जागांसाठी अर्ज केला आहे, त्यांना CBE फेरी पूर्ण केल्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)/ शारीरिक मानक चाचणी (PST) साठी उपस्थित राहावे लागेल.
अधिक माहितीसाठी उमेदवार अधिसूचना पाहू शकतात.
लिंक :
Click to access corrigendum%20to%20MTS%202024%20pdf31724.pdf
© IE Online Media Services (P) Ltd