SSC CPO Recruitment 2024 : पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची एक मोठी संधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत (SSC) उपनिरीक्षक, दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षा २०२४ च्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अंतर्गत तब्बल ४१८७ रिक्त जागांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. उमेदवार SSC ची अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ४ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ मार्च २०२४ निश्चित करण्यात आली आहे. परंतु, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसह, वयाची अट आणि अर्ज शुल्कासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
परीक्षेचे नाव
दिल्ली पोलिस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा २०२४
पदाचे नाव आणि तपशील
१) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe) – पुरुष – १२५ रिक्त जागा
२) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe) – महिला – ४० रिक्त जागा
३) CAPF मधील उपनिरीक्षक (GD)- ४००१ रिक्त जागा
वयाची अट
उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२३ पर्यंत मोजले जाईल. किमान वय २० वर्षे आणि कमाल २५ वर्षे. याचा अर्थ २ ऑगस्ट १९९९ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००४ नंतर जन्मलेले उमेदवार अर्ज करू शकतात. (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
अर्जाचे शुल्क
General/OBC: १०० रुपये
SC/ST/ExSM/ महिला : फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ मार्च २०२४
अर्जातील दुरुस्तीची शेवटची तारीख: ३० मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४
परीक्षा कधी होणार (CBT): ०९, १० आणि १३ मे २०२४
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट – पाहा
अधिकृत नोटिफिकेशन : पाहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : Apply Online