SSC Recruitment 2023: कर्मचारी निवड आयोगातर्फे विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये मेगा भरती केली जाणार आहे. एसएससी (Staff Selection Commission) सिलेक्शन फेज ११ अंतर्गत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. इच्छुक उमेदवार आयोगाच्या ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण माहिती मिळवू शकतात. वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सोय देखील आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया नुकतीच सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसएससी सिलेक्शन फेज ११ अंतर्गत होणाऱ्या भरतीमार्फत नोकरी मिळवण्यासाठी सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये पास होणाऱ्या उमेदवारांना पुढे काही परीक्षा द्याव्या लागतील. परीक्षांव्यतिरिक्त त्यांना स्किल टेस्ट देखील द्यावी लागेल. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी निवड आयोग तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त पदांसाठी उपयुक्त उमेदवारांची भरती करणार आहे. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांपासून ते पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी वयवर्ष १८ ते ३० ही वयाची अट आहे. अधिकची माहिती आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

आणखी वाचा – State bank of India मध्ये होतेय भरती! इच्छुक उमेदवारांना ‘या’ तारखेपूर्वी अर्ज करा; महिन्याचा पगार आहे…

कर्मचारी निवड आयोगाने आयोजित केलेल्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया ६ मार्च २०२३ रोजी सुरु झाली आहे. तर २७ मार्च हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज करण्यासाठी १०० रुपये भरावे लागणार आहेत. पैसे भरण्याची शेवटची तारीख २८ मार्च आहे. काही वेळेस अर्ज करताना त्यामध्ये काही चूका होऊ शकतात. तर आयोगाकडून अर्ज स्वीकारताना काही गोष्टी पुढेमागे होऊ शकतात. तेव्हा चूक सुधारुन दुरुस्त करण्यासाठीची संधी आयोगाद्वारे दिली जाते. ३ ते ५ एप्रिल या तीन दिवसांमध्ये अर्जमध्ये झालेल्या चूका दुरुस्त करता येणार आहेत. जून किंवा जुलै महिन्यामध्ये भरतीच्या परीक्षेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल. परीक्षा सुरु होण्याच्या सात ते आठ दिवसांपूर्वी परीक्षेसाठी लागणारे ओळखपत्र देण्यात येईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ssc releases notice for selection post phase 11 registration starts for more then five thousand posts apply before 27 march yps
Show comments