SSC Bharti 2024: तरुण मंडळी सतत नोकरीच्या शोधात असतात. तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रकिया सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी अर्ज करुन तुम्ही चांगला पगार कमावू शकता. तब्बल १२१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/उच्च विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/ निम्न विभाग लिपिक पदांच्या एकूण 121 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. आता तुम्हाला वाटले की हा अर्ज कसा भरायचा? अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? या पदासाठी शैक्षणिक पात्रता किती? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पगार किती मिळणार, याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदाचे नाव –

१. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/उच्च विभाग लिपिक
२. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/निम्न विभाग लिपिक

पदसंख्या –

१. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/उच्च विभाग लिपिक – ६९
२. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/निम्न विभाग लिपिक – ५२
एकूण – १२१

अर्ज पद्धत – ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाइट – https://ssc.nic.in/ या वेबसाइटवर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

हेही वाचा : C-DAC मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअरसह ‘या’ पदासाठी मोठी भरती, जाणून घ्या अर्ज करायची प्रक्रिया, पात्रतेचे निकष

वेतनश्रेणी

१. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/उच्च विभाग लिपिक – २५,५०० ते ८११००
२. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/निम्न विभाग लिपिक – १९,९०० ते ६३,२००

अर्ज कसा करावा?

  • अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.
  • यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
  • त्यासाठी https://ssc.nic.in/ अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा.
  • अर्ज भरण्यापूर्वी वेबसाईटवरील सूचना सविस्तर वाचाव्यात आणि त्यानंतरच अर्ज भरावा.
  • अपूर्ण माहिती किंवा कागदपत्र सादर करू नये अन्यथा अर्ज अपात्र ठरवला जाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०२४ आहे. त्यानंतर केलेले अर्ज सुद्धा अपात्र ठरवले जाईन.
  • त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा आण सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.