सुहास पाटील

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत ज्युनियर इंजिनिअरच्या निवडीकरिता घेण्यात येणारी ज्युनियर इंजिनिअर (सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) परीक्षा २०२३ दि. २६ जुलै २०२३ रोजी जाहीर झाली आहे.

MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maharashtra Board s Class 12admit card will be available online from Friday January 10
राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
Special campaign for caste certificate verification.
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम…
MPAC Mantra Intelligence Test and Arithmetic Group B Non Gazetted Services Pre Exam sports news
एमपीएसी मंत्र: बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित; गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा
savitribai phule pune university warns affiliated colleges for not providing naac information
‘नॅक’ची माहिती न दिल्यास प्रवेशांवर निर्बंध; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संलग्न महाविद्यालयांना इशारा
neet ug exam supreme court
शिफारशींची नीट अंमलबजावणी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती
mpsc exam result list announced social welfare category
वादात सापडलेल्या एमपीएससीच्या या परीक्षेची उत्तरतालिक जाहीर, हरकतीसाठी मुदत…

केंद्र सरकारच्या सेंट्रल वॉटर कमिशन (CWC), सेंट्रल पब्लिक वर्क्‍स डिपार्टमेंट (CPWD), मिलिटरी इंजीनिअरींग सव्‍‌र्हिसेस (MES), बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) इ. ऑर्गनायझेशनमध्ये ज्युनियर इंजिनिअर ग्रुप-बी (नॉन-गॅझेटेड) पदांची भरती या परीक्षेतून केली जाते. (वेतन – पे-लेव्हल – ६, दरमहा रु. ६५,०००/-)

एकूण १,३२४ पदे (अजा – ९०६, अज – ९६, इमाव – २८८, ईडब्ल्यूएस – १२१, खुला – ६१३).

रिक्त पदांचा तपशील :

(१) बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) – ज्युनियर इंजिनिअर (सिव्हील)  JE(C) – ४३१ पदे.

पात्रता : सिव्हील इंजीनिअरींग पदवी किंवा सिव्हील इंजीनिअरींग पदविका आणि सिव्हील इंजीनिअरींगमधील प्लानिंग/ एक्झिक्युटिव्ह/ मेंटेनन्स कामाचा २ वर्षांचा अनुभव.

(२) बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) – ज्युनियर इंजीनिअर (इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड मेकॅनिकल) JE (E&M) – ५५ पदे.

पात्रता : इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजीनिअरींग किंवा इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजीनिअरींग पदविका आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.

(३) सेंट्रल पब्लिक वर्क्‍स डिपार्टमेंट (CPWD) –  JE (सिव्हील) – ४२१ पदे (१७ पदे दिव्यांग (कॅटेगरी  OH – ६,  HH – ६,  Others – ५) साठी राखीव).

(४) सेंट्रल पब्लिक वर्क्‍स डिपार्टमेंट (CPWD) –  JE (इलेक्ट्रिकल) – १२४ पदे (५ पदे दिव्यांग (कॅटेगरी  OH – २,  HH – २,  Others – १) साठी राखीव).

पद क्र. ३ व ४ साठी पात्रता : संबंधित विषयातील इंजीनिअरींग पदविका.

(५) सेंट्रल वॉटर कमिशन (CWC) –  JE (सिव्हील) – १८८ पदे (४ पदे दिव्यांग कॅटेगरी  Others साठी राखीव).

(६) सेंट्रल वॉटर कमिशन (CWC) –  JE (मेकॅनिकल) – २३ पदे (१ पद दिव्यांग कॅटेगरी  Others साठी राखीव).

पद क्र. ५ व ६ साठी पात्रता : संबंधित विषयातील इंजीनिअरींग पदवी किंवा पदविका.

(७) मिलिटरी इंजीनिअरींग सव्‍‌र्हिसेस (MES) –  JE (C) – २९ पदे.

(८) मिलिटरी इंजीनिअरींग सव्‍‌र्हिसेस (MES) –  JE (E & M) – १८ पदे.

पद क्र. ७ व ८ साठी पात्रता : संबंधित विषयातील इंजीनिअरींग पदवी किंवा संबंधित विषयातील पदविका आणि २ वर्षांचा अनुभव.

(९) फराक्का बॅरेज प्रोजेक्ट –  JE (C) – १५ पदे

(१०) फराक्का बॅरेज प्रोजेक्ट –  JE (M) – ६ पदे आणि इतर डिपार्टमेंट्समधील  JE(C) – ११ पदे,  JE(M) – २ पदे,  JE(E) – १ पद.

पद क्र. ९ व १० आणि इतर पदांसाठी – संबंधित विषयातील इंजीनिअरींग डिप्लोमा.

वयोमर्यादा : दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी पद क्र. ३ व ४ सीपीडब्ल्यूडीमधील पदांसाठी ३२ वर्षेपर्यंत, (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट १९९१ ते १ ऑगस्ट २००५ दरम्यानचा असावा.) इतर पदांसाठी ३० वर्षेपर्यंत. (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट १९९३ ते १ ऑगस्ट २००५ दरम्यानचा असावा.) (उच्चतम वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ५ वर्षेपर्यंत, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षेपर्यंत)

बीआरओ (जीआरईएफ)मधील पदांसाठी शारीरिक मापदंड : उंची – १५७ सें.मी., छाती – ७५-८० सें.मी., वजन – ५० कि.ग्रॅ. शिवाय त्यांना शारीरिक क्षमता चाचणी (१ मैल अंतर १० मिनिटांत धावणे) द्यावी लागेल. दृष्टी चष्म्यासह – ६/६.

निवड पद्धती : पेपर-१ – ऑक्टोबर २०२३ मध्ये घेतला जाईल. (संगणकावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी). (१) जनरल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड रिझिनग – ५० प्रश्न, (२) जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न, (३) पार्ट-ए – जनरल इंजीनिअरींग (सिव्हील अँड स्ट्रक्चरल) किंवा पार्ट-बी – जनरल इंजीनिअरींग (इलेक्ट्रिकल) किंवा पार्ट-सी – जनरल इंजीनिअरींग (मेकॅनिकल) – १०० प्रश्न. एकूण २०० प्रश्न. प्रत्येक प्रश्नाला १ गुण. एकूण २०० गुण, वेळ २ तास.

पेपर-२ – कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टाईप पार्ट-ए – जनरल इंजीनिअरींग (सिव्हील अँड स्ट्रक्चरल) किंवा पार्ट-बी – जनरल इंजीनिअरींग (इलेक्ट्रिकल) किंवा पार्ट-सी – जनरल इंजीनिअरींग (मेकॅनिकल) एकूण १०० प्रश्न, ३०० गुणांसाठी वेळ २ तास. इंजीनिअरींग वरील प्रश्नांचा दर्जा पदविका स्तरावरील असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.

उमेदवारांना पेपर-२ च्या वेळी स्वतचा  Slide- Rule,  Calculator,  Logarithm Table आणि  Steam Table आणण्यास परवानगी आहे.

पेपर-१ व पेपर-२ मधील गुणवत्तेनुसार उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी निवडले जातील. कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी पदांचा पसंतीक्रम द्यावयाचा आहे.

अंतिम निवड : पेपर-१ व पेपर-२ मधील गुणवत्तेनुसार व पदांच्या पसंतीक्रमानुसार केली जाईल. कागदपत्र पडताळणी  User Department कडून घेतली जाईल.

परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, पणजी इ.

परीक्षा शुल्क : रु. १००/-. (अजा/ अज/ महिला/ दिव्यांग यांना फी माफ आहे.) ऑनलाइन पद्धतीने फी दि. १६ ऑगस्ट २०२३ (२३.०० वाजे)पर्यंत भरता येईल.

अ‍ॅडमिट कार्ड परीक्षेच्यापूर्वी ३ ते ५ दिवस अगोदर  Regional Director SSC वेस्टर्न रिजनच्या  http://www.sscwr.net या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.

ऑनलाइन अर्जासोबत  JPEG/ JPG Format (20  kb to 50  kb) मध्ये स्कॅन केलेला कलर पासपोर्ट साईज फोटोग्राफ चष्मा न घालता काढलेला (3.5  cm width x 4.5  cm.  height) आणि स्कॅन केलेली उमेदवाराची स्वाक्षरी (10  to 20  kb) अपलोड करावयाची आहे.

हा फोटो जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या दिनांकाच्या (म्हणजेच २६ जुलै २०२३ च्या) ३ महिने अगोदर काढलेला नसावा.

ऑनलाइन अर्जात काही सुधारणा/ बदल करावयाचा असल्यास  Window for Application Form Correction दि. १७/१८ ऑगस्ट २०२३ (२३.०० वाजे) पर्यंत उपलब्ध असेल.

अजा/ अजच्या उमेदवारांकडे  Annexure- VII, इमावच्या उमेदवारांकडे  Annexure- VIII, ईडब्ल्यूएस उमेदवारांकडे  Annexure- IX मधील दाखले असावेत.

अर्ज कसा करावा : (१) रजिस्ट्रेशन –  One time Registration कसे करावे याची विस्तृत माहिती जाहिरातीमधील  Annexure- III मध्ये उपलब्ध आहे. (२)  Apply Online (ऑनलाइन अर्ज कसा भरावा याची विस्तृत माहिती जाहिरातीमधील  Annexure- IV मध्ये उपलब्ध आहे.)

ऑनलाइन अर्ज  https://ssc.nic.in या संकेतस्थळावर दि. १६ ऑगस्ट २०२३ (२३.०० वाजे) पर्यंत करावेत.

Story img Loader