SSC Selection Posts Bharti 2024 : दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची एक मोठी संधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत विविध रिक्त पदे भरण्यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशन तब्बल २,०४९ रिक्त जागा भरणार आहे. उमेदवार २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिक्त पदांची नावे व तपशील

लॅब अटेंडन्ट, लेडी मेडिकल अटेंडन्ट, मेडिकल अटेंडन्ट, नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट, फिल्डमन, डेप्युटी रेंजर, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, अकाउंटन्ट, असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर अशा प्रकारे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. तुम्हाला अधिक तपशील जाणून घ्यायचा असल्यास खालील लिंकवर क्लिक करा.

पदांसंदर्भातील तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

शैक्षणिक पात्रता

१० वी उत्तीर्ण / १२ वी उत्तीर्ण / पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

वयाची अट

उमेदवाराचे ०१ जानेवारी २०२४ रोजी किमान वय हे १८ वर्षे; तर कमाल वय हे २७ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. त्यात SC/ST वर्गाकरिता वयामध्ये ०५ वर्षे; तर OBC प्रवर्गाकरिता वयामध्ये ०३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरीचे ठिकाण

मध्य प्रदेश, पूर्व प्रदेश, कर्नाटक, केरळ प्रदेश, मध्य प्रदेश उप-प्रदेश, उत्तर पूर्व प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तर पश्चिम उप-प्रदेश, दक्षिण क्षेत्र व पश्चिम क्षेत्र.

अर्जाचे शुल्क

General/OBC : १०० रुपये SC/ST/PWD/ExSM/महिला : शुल्क नाही

महत्त्वाच्या तारखा

१) SSC सिलेक्शन पोस्ट फेज 12 ऑनलाइन अर्ज – २६ फेब्रुवारी २०२४

२) अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – १८ मार्च २०२४

३) ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख – १९ मार्च २०२४

४) संगणक-आधारित परीक्षेची तारीख (पेपर-I) – ६, ७ व ८ मे २०२४

५) पेपर-II ची तारीख – लवकरच जाहीर केली जाईल.

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी : Apply Online

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Staff selection commission ssc selection posts recruitment 2024 for 2049 selection posts phase xii 2024 vacancies read all details sjr
Show comments