डॉ.श्रीराम गीत
इंजिनीअरिंगचे शिक्षण घेताना शाखांचे जितके पर्याय जास्त तितके निर्णय घेण्यात आपण अधू होत जातो. याला ‘कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट’ असं म्हणतात. यातून एक म्हणजे कोणताच निर्णय घेत नाही किंवा अतिशय ओळखीचा पर्याय घेतला जातो किंवा निवडलेल्या पर्यायाबद्दल नंतर असमाधान कायम राहते. मला आयटी क्षेत्रात जायचे आहे किंवा कॉम्प्युटर सायन्समध्येच काम करायचं आहे असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात काय काम करायचे असते याच्याबद्दलची स्पष्टता फार क्वचित असते. पण आयटी छान हे मेंदूत ठसलेले असते. आयटी क्षेत्रात कोणकोणत्या स्वरूपाची कामे चालतात? काय काम सांगितले जाते? त्यासाठीची कौशल्य कोणती लागतात? आपले विषय कोणते पक्के करायला पाहिजेत? याची माहिती असणारा विद्यार्थी खरोखर शोधावा लागतो.
मला कॉम्प्युटर आवडतो. त्यातील खूप काही कळते. त्यातील विविध गोष्टी मी करतो. असे सांगणारे सरसकट विद्यार्थी नेहमीच भेटतात. सहसा त्यांच्या आयांकडून याला खतपाणी घालणाऱ्या खूप गोष्टींची भर घातली जाते. ‘त्याला खूप कळत आणि तो त्यात अगदी माहीर आहे.’ अस सांगणारी आई अनेकदा भेटते. त्यामध्ये काही आयटीत काम करणारीही असते. एक गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे या मुलांना आई काय काम करते हे तिला कधी विचारलेस का? किंवा वडील आयटीत आहेत तर त्यांच्या कामाचे स्वरूप काय? काय शिकले आहेत? हे कधी विचारले आहेस का? असे विचारले तर अक्षरश: काहीही उत्तर मिळत नाही. कारण असा साधा संवाद झालेलाच नसतो. आयटी क्षेत्रात आई-वडील काम करत असून जर इतका दिव्याखाली अंधार असेल तर इतर घरांबद्दल किंवा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल काय सांगावे?
हेही वाचा >>> पदवीधरांना नोकरीची संधी! BMC अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, अर्जाची पद्धत जाणून घ्या
आयटीचे गारूड डोक्यावर आरूढ
आयटी म्हणजे भरपूर पगार. एसीत बसून काम या आकर्षणापलिकडे कोणतीही चौकशी न करता वळणारे संख्येने खूप व त्यांचा ओघ सतत वाढत आहे. जितके विद्यार्थ्यी दरवर्षी प्रवेश घेतात त्याच्या जेमतेम सात ते दहा टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात. ज्यांना नोकऱ्या मिळतात त्यांच्याकडे फक्त दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. तल्लख गणिती बुद्धी आणि जोडीला तर्क विचार क्षमता. विविध कॉलेजातून कॅम्पस इंटरव्यूला जाणे अनेक कंपन्यांनी बंद केले आहे. तीन प्रमुख कंपन्यांनी ऑनलाइन टेस्ट ‘सर्व’ प्रकारच्या इंजिनीअर्ससाठी उपलब्ध करून दिली आहे. जे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गुणांनी ती टेस्ट सोडवतील त्यांनाच प्रत्यक्ष मुलाखतीकरिता बोलवण्याची पद्धत आता गेली तीन वर्षे रुळली आहे. पदवीचे मार्क चांगले असूनही तर्क विचारक्षमता व गणिती बुद्धी कमी पडल्यामुळे ही टेस्ट क्रॅक करणे कठीण जाते. त्यामुळे बेकार राहिलेल्यांची संख्या खूप मोठी असते. अन्य शाखातील इंजिनीअरकडे काही ना काही इंजिनीअरिंग मधील कौशल्य असते. त्यांना अन्य स्वरूपाच्या नोकऱ्या मिळतात. मात्र आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्समधील पदवीधरांना अन्य काहीही येत नसल्यामुळे त्यांना नोकरी शोधण्यात खूप अडचणी येतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे निवडून उत्तम पगार देऊन नोकरीवर घेतलेल्या प्रत्येक उमेदवाराला किमान सहा महिने ते एक वर्ष प्रशिक्षण देऊन मगच प्रत्यक्ष प्रोजेक्टच्या कामात समाविष्ट करता येते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना असे वाटत असते की इयत्ता पहिलीपासून मी कॉम्प्युटर मध्ये खूप खूप शिकलो. मला काहीही करता येते त्यांचा प्रशिक्षणाच्या रेट्याखाली हळूहळू भ्रमनिरास होऊ लागतो. काहींना हे प्रशिक्षण सहज जमते. काहींना अवघड वाटते. काहींना जमतच नाही. मात्र तीनही गटातील विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणावरती प्रचंड खर्च करून, पगार देऊन प्रशिक्षित केले असल्यामुळे त्यांना विविध वर्गवारीनुसार, विविध प्रतीचे काम दिले जाते. प्रत्यक्ष प्रोजेक्ट मिळाल्यानंतर मला माझ्या आवडीचे, लायकीचे काम मिळाले नाही म्हणून आता मी दुसरेच काहीतरी करू इच्छितो असे म्हणणाऱ्यांची संख्या पुन्हा जवळपास ४० टक्के पर्यंत पोचते. यावर नेमका असा उपाय नाही. पण एक गोष्ट सगळे जण करू शकतात. कॉम्प्युटर शाखेची निवड करण्यापूर्वी स्वत:ची तर्क विचारबुद्धी व गणिती क्षमता दहावीच्या मार्कावर अवलंबून न ठेवता बारावी संपेपर्यंत प्रयत्नपूर्वक वाढवण्याचा प्रयत्न करणे सहज शक्य असते. अभ्यासक्रमातील गणिते सोडवणे व त्यात मार्क मिळवणे याचा याच्याशी फार संबंध नसतो. ते फक्त प्रवेशासाठी कदाचित उपयोगी पडतात. या संदर्भात विस्ताराने येथे लिहिणे येथे शक्य नाही. त्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञांची मदत घेतली तर नक्की फायदा होऊ शकतो. पण जी मुले स्वत:च्या आयटीत काम करणाऱ्या आई-वडिलांशीही संवाद साधत नाहीत ती अशा अवघड रस्त्याचा कधीच विचार करत नाहीत. यामुळे आयटी क्षेत्रातील तीव्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच ते बाजूला पडणार हे नक्की झालेले असते.