अनुराधा सत्यनारायण-प्रभुदेसाई
करोनाची साथ संपली त्याच कालावधीत समीर बीएससी-आयटीमधून उत्तीर्ण झाला होता. त्याला त्याच्या शिक्षणाशी निगडीत नोकरी लागली. त्याने एक वर्ष कामही केले. मात्र, त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला कामगिरी सुधारण्यासाठी त्याला काही ठरावीक मुदत देण्यात आली. चिंता आणि टोकाची भीती या समस्या घेऊन समीर मला भेटायला आला. त्याला इतरही समस्या भेडसावत होत्या. एक म्हणजे कंपनीने दिलेले टारगेट अर्थात कामातील लक्ष्य मुदतीत पूर्ण करण्यात तो अपयशी ठरत होता. दुसरे म्हणजे त्याच्या सहकाऱ्यांबरोबर संवाद साधण्यात त्याला अडचणी येत होत्या. जेव्हा तो मला भेटला तेव्हा त्याच्या समस्यांमुळे तो हताश झाला होता आणि त्याच्या अपयशाने उदास दिसत होता. पालकही निराश दिसत होते.
* समीरसाठी कृती योजना
समीरने करोनाच्या वर्षांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यामुळे बहुतेक सूचना ऑनलाइन होत्या ज्यात आवश्यक अभ्यासक्रम कौशल्ये दिली गेली नाहीत.
* मूल्यांकन
समीरला त्याची मुख्य ताकद आणि त्याच्या विकासाची क्षेत्रे ओळखण्यात मदत करण्यासाठी तसेच सुसंगत करिअरची निवड करण्यासाठी अॅप्टिटय़ूड टेस्ट घेण्यात आली.
हेही वाचा >>> शिक्षणाची संधी : भारतीय नौदलामध्ये बी.टेक.
* मूल्यांकनानंतर पुढील पायऱ्या:
त्याच्यासाठी योग्य करिअरचा मार्ग निवडण्यात आला. (त्याला आयटी क्षेत्रातून बाहेर पडायचे होते), त्यासाठी विविध प्रकारचे अभ्यासक्रम समोर ठेवण्यात आले. समीर मॅनेजमेंट कोर्स निवडायचा हे ठरवलं.
भारतात उपलब्ध असलेल्या विविध व्यवस्थापन परीक्षांचे तपशील, त्यातील पहिल्या क्रमांकाच्या आणि तसेच इतर महत्त्वाच्या मॅनेजमेंटचे शिक्षण देण्याच्या संस्थांचे तपशील समीरला सांगण्यात आले.
* योजनेची रूपरेषा
एमबीए परीक्षेसाठी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आणि परीक्षेच्या अभ्यासासाठी आणि तयारीसाठी दैनंदिन योजना आणि वेळापत्रक तयार करण्यात आले. व्यक्तिमत्व चाचणी आणि मुख्य परीक्षांतील समीरच्या उणीवांवर काम करण्यात आले.
हेही वाचा >>> नोकरीची संधी
* स्वत:वर काम करणे
समीरसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या आतील भीतीच्या राक्षसांवर विजय मिळवणे. त्याच्या नकारात्मक आणि आत्मविश्वासावर घाला घालणाऱ्या करणाऱ्या मूळ समजुतींवर काम करणे. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी ( उइळ) च्या तंत्रांचा वापर करून, त्याच्या स्वत:च्या योग्यतेसंबंधी (मी पुरेसा पात्र नाही), त्याच्या अपयश आणि यशाच्या संकल्पना (मला नेहमीच यश मिळाले/ मी कधीही अपयशी होऊ नये) याविषयीच्या त्याच्या मूळ संकल्पनांवर काम केले गेले.
आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी नकारात्मक स्वगत ओळखणे आणि त्याच्या जागी सजग राहून सकारात्मक बोलणे आणि त्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष देणे समीरला शिकवले गेले.
* पालकांचा सहभाग
मुलांच्या अपयशाने निराश झालेल्या पालकांनी आपली वैयक्तिक निराशा दूर ठेवून मुलाला आधार देणे आणि त्याचा आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सक्षम बनविण्याची आवश्यक आहे.
* समग्र व्यक्तिमत्व तयार करणे
* गटचर्चेसाठी उपस्थित राहणे / गटचर्चा सत्र पाहणे यशाची कल्पना करणे
* अर्थशास्त्र, चालू घडामोडी, तंत्रज्ञान आणि सामाजिक समस्यांशी संबंधित विविध विषयांचे वाचन आणि चिंतन यांचा समावेश करण्यात आला.
* भाषिक आणि मौखिक संभाषण कौशल्ये तयार करण्यासाठी चांगले जागतिक वक्त्यांचे विचार ऐकणे. मार्च २०२३ मध्ये समीरने MH- CET उत्तीर्ण करून ९० टक्के गुण मिळवले आणि चांगल्या मॅनेजमेंट संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाला.