प्रवीण निकम
युवक मित्रांनो नमस्कार, आजच्या लेखात तुमचं स्वागत. आजचा लेख तुम्हाला एका वेगळ्या शिष्यवृत्तीबद्दल माहिती देण्याबाबत तर आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना आधारवड म्हणून काम करणाऱ्या एका संस्थेविषयी देखील आहे. पुणे, विद्योचे माहेरघर असणाऱ्या या पुण्यात दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणारे अनेक विद्यार्थी शिकण्याची जिद्द उराशी बाळगत, कितीतरी किलोमीटरचा प्रवास करत दाखल होतात. या मुलाच्या इथे आल्यावर अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या अशा मूलभूत गरजा माफक दरात सांभाळून घेणारी संस्था म्हणजेच ‘विद्यार्थी साहाय्यक समिती पुणे’.

१९५५ मध्ये ज्येष्ठ गणिततज्ज्ञ डॉ. अच्युतराव आपटे, स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ फाटक, सुमित्राताई केरकर अशा दिग्गजांनी स्थापन केलेली ही संस्था. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवत्तेच्या जोरावर काहीतरी ध्येय ठेवून धडपड करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुण्यात अतिशय माफक दरात राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली. आता समितीची पुण्यात ७ वसतिगृहे असून त्यातून सुमारे ११०० विद्यार्थी / विद्यार्थिनी त्यातील सुविधांचा लाभ घेत आहेत. समिती हे विद्यार्थ्यांसाठीचे केवळ लॉजिंग बोर्डिंग नाही, तर येथे माफक दरात निवास, भोजन व्यवस्थेबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व देणारे दुसरे घर आहे. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, उद्याोजकतेचे बाळकडू त्यांना मिळावे यासाठीही संस्था प्रयत्न करताना दिसते. स्वच्छता, समता आणि श्रमप्रतिष्ठा या त्रिसूत्रीला महत्त्वाचे मानत, देशासाठी जबाबदार नागरिक घडविण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असताना दिसते. समितीत सर्व जातीधर्मातील विद्यार्थी एका छताखाली राहतात. ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी जे काही स्थलांतर करावे लागते त्यात ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’ ही संस्था त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवत गेली अनेक वर्ष साहाय्य करताना दिसते.

PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
The first college in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे पुण्यात! २०० वर्षे जुने हे कॉलेज माहितेय का?
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
sharad pawar nagpur, Sharad Pawar visits Nagpur,
पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते

आता अर्थात तुम्हाला प्रश्न पडला असेल की, संस्था विद्यार्थ्यांचा हा खर्च नक्की कशा प्रकारे उचलते. तर अनेक देणगीदार, दानशूर व्यक्ती यासाठी संस्थेला मदत करतात आणि या जमा होणाऱ्या रकमेतून या सर्व विद्यार्थ्यांच्या राहण्याची, भोजनाची आणि त्यांना लागणाऱ्या इतर सोयी सुविधांची सोय केली जाते. समितीची प्रवेश प्रक्रिया खालील प्रमाणे असते.

विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर जाऊन नियमावली वाचल्यावर रु. १०० फॉर्म फी ऑनलाइन भरावी. त्यानंतर लिंक ओपन करून प्रवेश अर्ज भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह सबमिट करावा लागतो.

विद्यार्थ्याची व त्यांच्या पालकांची मुलाखत घेतली जाते. (ज्यात आर्थिक स्थिती बरोबर गुणवत्तेचाही विचार केला जातो )

प्रवेश निश्चित झाल्यानंतरच शुल्क भरण्यास सांगितले जाते. (मूळ कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी तपासण्यात येतात.)

कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नाचा तहसीलदार / संबंधित अधिकाऱ्याचा दाखला किंवा पालक नोकरदार असल्यास सर्व भत्ते दर्शविणारे चालू पगारपत्रक, शेती असल्यास ७/१२ व ८/अ चा उतारा अशी काही कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

अवर्षण, अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त गावातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना त्यांना गरज भासल्यास गावाची पैसेवारी /पीक नुकसानीचे शेकडा प्रमाण गावचे तलाठी यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडल्यास भोजन व निवास शुल्क सवलतीचा विचार केला जातो.

‘विद्यार्थी साहाय्यक समिती’त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की कशा पद्धतीचे साहाय्य मिळते आणि त्याबाबतच्या अटी काय असतील तर –

१. ज्या पालकांचे कमाल वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये आहे. त्यांच्या पाल्याला प्रवेश दिला जातो. (उत्पन्नाची हे अट असली तरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती व कुटुंबातील अवलंबून असलेल्या व्यक्तींची संख्या विचार करता प्रवेश देताना नियम शिथिल केले जातात.)

२. अभ्यासासाठीची क्रमिक पुस्तके, संगणकीय कक्ष, वाचनालय विनामूल्य असते. लॅपटॉप काही आगाऊ रक्कम घेऊन दिला जातो.

३. गैरवर्तणुकीच्या कारणामुळे प्रवेश रद्द झाला किंवा परवानगी न घेता वसतिगृह सोडल्यास कोणत्याही प्रकारची फी परत मिळत नाही.

४. प्रवेश अर्जातील संमतीपत्रक भरून देणे आवश्यक आहे. प्रवेश झाल्यावर त्यात काही माहिती चुकीची आढळून आल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो.

या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’मध्ये प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नाचे निराकरण करत काम करणाऱ्या या संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा देखील विचार केला जातो आणि म्हणूनच संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याला रोज अर्धा तास योगासने, कमवा शिका योजनेत सहभाग घेणे व काही कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य असते. विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी रोज अर्धा तास काम करणे अनिवार्य आहे. यामध्ये स्वच्छता, निधी संकलन, भोजनालयातील कामे विद्यार्थ्यांनी करायची असतात. हे सर्व विद्यार्थ्यांना संस्कारित मूल्ये देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांने करणे संस्थेच्या अटी व शर्ती मध्ये बंधनकारक करण्यात आले आहे. हे सर्व विद्यार्थांना भविष्यकालीन वाटचालीसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने आणि आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने संस्था प्रयत्नपूर्वक करते आहे, कारण ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’च्या दृष्टिकोनातून हे त्यांचे एक युवा परिवर्तन केंद्र आहे आणि म्हणूनच ते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मूलभूत गुणांचा विकास कसा करता येईल यावर भर देताना दिसतात.

गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात काम करणाऱ्या या संस्थेच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेनुसार मुलींसाठी नवीन वसतिगृह उभारले असल्याने अधिकच्या ३३६ जागा संस्थेने गरजू विद्यार्थ्यांसाठी खुल्या केल्या आहेत. २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षासाठीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या जागा भरल्या गेल्या असून या जागांसाठी दुसऱ्या, तिसऱ्या व त्यापुढील वर्षांच्या अभ्यासक्रमांच्या फक्त मुलींसाठीचे प्रवेश सध्या सुरू आहेत.

२०२४ मध्येच अहमदनगर येथेही ६० मुलींसाठी एक वसतिगृह सुरू झाले आहे. १२० मुलांसाठीच्या वसतिगृहाचे काम सुरू आहे. ते पुढील वर्षी सुरू होईल. ग्रामीण भागात जी उच्च शिक्षणाची स्वप्ने पूर्ण होत नाहीत ती पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी असणाऱ्या आणि त्यांना पुण्यासारख्या विद्योच्या महानगरात हक्काचा विसावा देणाऱ्या या संस्थेचा फायदा अनेक गरजू वंचित विद्यार्थांना होईल याच उद्देशाने हा आजचा लेख लिहिला आहे. ज्याचा फायदा अनेकांना होईल अशी आशा वाटते. ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’ विषयी तुम्ही www. samiti. org या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.