Success Story: मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश कधी तुम्हाला मोठे करेल ते सांगता येत नाही. झारखंडमधील ३७ वर्षांच्या गगन आनंदच्या यशाचा हा प्रवासही अनेकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. वयाच्या १७ व्या वर्षी फक्त १,२०० रुपये घेऊन, तो आपल्या दिल्लीला राहणाऱ्या भावाकडे आला. यावेळी हाताशी पैसे जरी कमी असले तरी त्याच्या डोळ्यांत अनेक स्वप्नं होती.

दिल्लीत आल्यानंतर त्याने पिझ्झा हटमध्ये नोकरी सुरू केली. या कामात त्याला महिन्याला १,५०० रुपये मिळायचे. परंतु आता तो स्कुझो आइस-ओ-मॅजिक नावाने आइस्क्रीम विकणाऱ्या कंपनीचा मालक आहे. त्याच्या कॅफेमध्ये अनेक प्रकारचे आइस्क्रीम्स उपलब्ध आहेत. तसेच त्याची वार्षिक उलाढाल सुमारे आठ कोटी रुपये आहे. परंतु, आता व्यावसायिक असलेला गगन अगोदर दिल्लीमध्ये अभिनेता बनण्यासाठी आला होता.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
Narendra Modi statement regarding the middle class in a meeting in Pune news
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो’; पुण्यातील सभेत विधान
pm modi rally in pune pm modi mega roadshow in pune ahead of maharashtra assembly elections
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद ; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देशाचा विकास’; पुण्यातील सभेत विधान
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता

गगन हा झारखंडचा रहिवासी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला गगन चार भावंडांमध्ये सर्वांत लहान असून, त्याला अभिनेता व्हायचे होते. मात्र, वडील निवृत्त झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाचा खर्च भागवणं कठीण होऊ लागलं. आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गगन अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन दिल्लीत आला होता.

दिल्लीत आल्यानंतर या क्षेत्रात करिअर करणं शक्य नाही हे त्याच्या पटकन लक्षात आलं. एके दिवशी दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये फिरत असताना त्याची नजर पिझ्झा हटच्या दारावर पडली. येथे त्याने पहिली नोकरी सुरू केली. मेहनतीमुळे गगन वयाच्या २१ व्या वर्षी रेस्टॉरंटचा जनरल मॅनेजर झाला. काही वर्षांतच त्याने जगातील अनेक देशांमध्ये अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसोबत काम केले.

हेही वाचा: Success Story : जिद्दीला सलाम! SSB परीक्षेत मिळाला तब्बल १६ वेळा नकार; अखेर २०२४ मध्ये मिळवलं UPSC परीक्षेत यश

अशा प्रकारे गगनचा व्यावसायिक प्रवास सुरू झाला

पिझ्झा हट आणि इतर अनेक ब्रॅण्ड्ससोबत काम करताना त्याने या क्षेत्राविषयीही ज्ञान मिळवले. परदेशातील नोकरी सोडून तो भारतात परत आला. येथे आल्यानंतर त्याने काही कंपन्यांमध्ये काम केले. २०२० मध्ये त्याने ‘स्कुजो आइस-ओ-मॅजिक’ नावाचा डेझर्ट कॅफे सुरू केला. त्यावेळी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने त्याला खूप त्रास झाला; पण त्याने धीर सोडला नाही. यावेळी गगनला नैसर्गिक आइस्क्रीम बनवण्याची कल्पना सुचली त्या आइस्क्रीममध्ये रिफाइईंड साखर वापरली जात नाही. आज ते अनेक प्रकारचे आइस्क्रीम्स बनवतात. त्यामध्ये ग्लुटेनफ्री आइस्क्रीमचाही समावेश आहे.

आज त्याच्या ब्रॅण्डची देशभरातील १५ राज्यांमध्ये ३० हून अधिक स्टोअर्स आहेत. गगनची कंपनी फ्रँचायजी मॉडेलवर काम करते. या ३० स्टोअर्सपैकी कंपनीची स्वतःची ५ स्टोअर्स आहेत आणि उर्वरित २५ स्टोअर्स फ्रँचायजी मॉडेलवर दिली आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये त्याची उलाढाल आठ कोटी रुपये आहे.