Success Story: आयुष्यात खूप पैसा कमावून श्रीमंत होणे हे अनेकांचे स्वप्न असते. जगातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोक हे स्वप्न दिवस-रात्र पाहत असतात. व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात, पण त्या अडचणींचा धैर्याने सामना केल्यास सर्वांत मोठे यशही सहज मिळविता येते. जगात अनेक लोक उज्ज्वल भविष्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी कठोर परिश्रम करतात, ते कधीही मागे हटत नाहीत. अशा अनेक दिग्गजांचा प्रेरणादायी प्रवास भारतीयांना ठाऊक आहे. या दिग्गज व्यावसायिकांमध्ये जयंती कनानी यांच्या नावाचाही समावेश आहे. एकेकाळी ते अत्यंत गरिबीत जगत होते, पण आज ते करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत.
जयंती कनानी आज जरी ५५,००० कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक असले, तरीही एकेकाळी त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांच्या आयुष्यातील एक काळ असा होता, जेव्हा त्यांच्या शाळेची फी भरण्यासाठीही त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. जयंती कनानी यांचे बालपण गुजरातमधील अहमदाबाद येथे गेले. ते एका गरीब कुटुंबातील असून त्यांचे वडील हिऱ्याच्या कारखान्यात मजुरी करायचे.
कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमध्ये जयंती कनानी यांनी कसे तरी कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक पूर्ण केले. त्यांना पुढचे शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती, पण घरच्या परिस्थितीमुळे त्यांना पुढे शिकता आले नाही, त्यामुळे जयंती कनानी यांनी बी.टेक पूर्ण होताच कामाला सुरुवात केली.
सहा हजारात केली नोकरी
कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक पूर्ण केल्यानंतर जयंती कनानी यांना नोकरी लागली, जिथे त्यांना पहिला पगार म्हणून फक्त ६,००० रुपये मिळाले. पण, एवढ्या पगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण असल्याने त्यांनी आणखी उत्पन्न मिळविण्यासाठी नोकरीनंतरही घरूनच काही प्रकल्पांवर काम करायला सुरुवात केली.
नोकरी आणि इतर कामांतूनही जयंती यांना फारसे पैसे मिळत नव्हते. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या लग्नासाठी कर्जदेखील काढले होते. पण, कालांतराने जयंती एका कंपनीत data analyst म्हणून काम करत असताना त्यांच्या करिअरमध्ये एक टर्निंग पॉइंट आला, जेव्हा ते संदीप नेलवाल आणि अनुराग अर्जुन यांना भेटले. कारण या तिघांचाही मुख्य उद्देश काहीतरी मोठं काम करून भरपूर पैसा कमावणे हा होता.
असे मिळाले यश
जयंती कनानी, संदीप नेलवाल आणि अनुराग अर्जुन या तिघांनी मिळून २०१७ मध्ये Polygon ही कंपनी सुरू केली. सुरुवातीला त्याचे नाव मॅटिक असे होते. या कंपनीने सहा वर्षातच खूप यश मिळवले. माहितीनुसार, या कंपनीची सध्याची किंमत ५५,००० कोटी रुपये आहे. पॉलीगॉनला प्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार मार्क क्यूबन यांच्याकडूनही निधी मिळाला आहे. तसेच २०२२ मध्ये पॉलीगॉनने सॉफ्टबँक, टायगर ग्लोबल आणि सेक्वोया कॅपिटल इंडियासारख्या गुंतवणूकदारांकडूनही जवळपास $४५० मिलियन निधी उभारला आहे.